२५ वर्षांपूर्वी ज्याने केला सर्वात मोठा भ्रष्ट्राचार त्याच कुटुंबात पुन्हा उमेदवारी देता मावळचे आमदार?







मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा नगरपरिषद निवडणूक २०२५ चा प्रचार शिगेला पोहचला असून शिवसेना आरपी आयचेअधिकृत उमेदवार सूर्यकांत वाघमारे २५ वर्षांपूर्वी लोणावळा नगरपरिषद ज्याकारणाने बरखास्त झाली ज्या सोनावणे कुटुंबामुळे झाली त्याच कुटुंबात मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून देतात ही गणित न कळण्यासारखे आहे. भ्रष्टाचारी उमेदवारासाठी मावळ चे आमदार घराघरात मतांसाठी जोगवा मागत फिरत आहेत. ही लाजिरवाणी गोष्ट आहे,असे ही वाघमारे म्हणाले.
वाघमारे दररोज २५ वर्षांपूर्वी लोणावळा नगरपरिषद येथे झालेल्या विविध घोटाळयांची नवनवीन प्रात्यक्षिक दाखवत आहेत आणि लोणावळ्यातील जनतेला त्या भ्रष्ट्राचाराची आठवण करून देत आहेत.त्यात टँकर घोटाळा,, स्विमिंग पूल घोटाळा काल डांबर घोटाळा चे प्रात्यक्षिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात केले.सूर्यकांत वाघमारे यांनी २५ वर्षांपूर्वी फक्त कागदी घोडे नाचवून प्रत्यक्षात कोणतेच विकास कामे झाली नाहीत. आणि ते भ्रष्ट्राचार सिद्ध झाल्याने नगरपालिकेवर बरखास्तीची वेळ आणली आणि त्याच कुटुंबातील मोठ्या भावाला २५ वर्षानंतर भ्रष्ट्राचार करायला आमदार पाठवतात ही सर्व पक्षांना,संस्थांना लोणावळ्यातील प्रामाणिक आणि चारित्र्य संपन्न उमेदवारसाठी धोक्याची घंटा आणि लोकशाहीचा गळा घोटणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीला भ्रष्ट्राचारच्या बुलडोजर खाली चिरडण्यासारखे आहे.त्याचे ही प्रात्यक्षिक वाघमारे यांनी दाखवले.ज्या कुटुंबामुळे लोणावळा नगरपरिषद भ्रष्ट्राचाराने बर्बटली,ज्यासाठी ५ दिवस उपोषण कार्यकर्त्यांना करावे लागले,त्यासाठी मावळचे आमदार मतांसाठी गल्लोगल्ली पायघड्या घालत आहेत चप्पल जिझवत आहेत असेही सूर्यकांत वाघमारे यावेळी म्हणाले.



