मणिपूर येथे घडलेल्या आदिवासी माता-भगिनी अत्याचार विरोधात वडगाव तहसील कार्यालयावर ट्रायबल फोरमचा निषेध मोर्चा


मावळ मराठा न्यूज़ ,वडगाव मावळ आज मावळ तालुका पुणे जिल्हा येथे मणिपूर येथे घडलेल्या आदिवासी माता-भगिनी अत्याचार विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला ,पोटोबा महाराज मंदिर ते वडगाव मावळ तहसील कार्यालय येथे येऊन श्री विक्रम देशमुख तहसीलदार यांना घटनेचे लेखी निवेदन देण्यात आले .सदर घटनेचा निषेध करण्यात आला .सदर निषेध मोर्चाचे नेतृत्व ट्रायबल फोरम पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष व सरपंच मारुती खामकर गुरुजी ,आदिवासी नेते किसन तळपे , सतू दगडे ,उपसरपंच, टाकवे ,राघोजी तळपे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला यावेळी मोर्चाला अनेक सस्था यांनी पाठिंबा दिला यात नारायण ठाकर, बाबाजी गायकवाड, कैलास गायकवाड यांनी कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्यावतीने मोर्चा पाठिंबा दिला .यावेळी मावळ तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीने मोर्चाचे आयोजन व नियोजन ट्रायबल फोरम मावळ अध्यक्ष मधुकर कोकाटे ,युवा ट्रायबल फोरम मावळ अध्यक्ष रविंद्र काठे, महिला ट्रायबल फोरम मावळ अध्यक्षा सारिका ताई कोकाटे यांनी केले. निषेध सभेनंतर सर्वांचे आभार संघटनेचे सचिव भिमाजी लोटे गुरुजी व जिल्हा युवक अध्यक्ष विक्रम हेमाडे यांनी मानले सुत्रसंचालन गुलाबराव गभाले, उपाध्यक्ष ट्रायबल फोरम मावळ यांनी केले




