नांगरगाव प्रभागात सुभाष डेनकर बिंद्रा गणात्रा मोठ्या मतधिक्क्याने विजयी होण्याचा मतदारांना विश्वास

मावळ मराठा न्युज – लोणावळा,सुभाष डेनकर आणि बिद्रा गणात्रा हे दोन्ही उमेदवार आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. ते निवडणुकापुरते जसं पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे बाहेर पडलेले नाहीत तर आपल्या प्रभागात आपल्या जिवाभावाच्या मतदारांशी नेहमीच त्यांच्या सुख दुःखात सहभागी होतात. आपल्या प्रभागातील महिलांच्या हातालाकाम मिळून ती कशी स्वबळावर उभी राहिल यासाठी बिंद्रा गणात्रा अनेक वर्ष कार्यरत आहेत त्यामुळे कोणत्याही स्वार्थासाठी नाही तर नांगरगाव प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी येथील मागील अनेक वर्षापासून रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांचे या प्रभागात कायसुधारणा करायच्या आहेत त्यासाठी ते आत्मीयतेने आणि मनापासून काम करण्याची तळमळ ही मतदाराना भुरळघालत आहे. आणि ह्याच जोरावर ते नक्की मोठ्या मतधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास त्यांचे हितचिंतक आणि त्यांचेवर मनापासून प्रेम करणारे मतदार व्यक्त करत आहेत.भाजपाचे येथील नगराध्यक्ष पदाचे सामान्य घरातील तरुण तडफदार उमेदवार असलेले गिरीश कांबळे यांना सुद्धा सम्पूर्ण लोणावळा शहरातून नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. एक तरुण व उमदे नेतृत्व म्हणून प्रत्येक जण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असल्याचे लोणावळा शहराचा नगराध्यक्ष म्हणून लोणावळेकर नागरिक त्यांनाच मोठ्या मतधिक्क्याने विजयी करतील असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे.सुभाष डेनकर आणि बिंद्रा गणात्रा हे दोन्ही भाजपचे उमेदवार निवडून आल्यानंतर नांगरगाव प्रभागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास नागरिक यांना असल्याने त्यांचे प्रभागात मोठ्या जल्लोषात स्वागतहोताना दिसत आहे.









