अत्यंत चुरशीच्या नाट्यवाचन स्पर्धेत आदिमचे कॉफी डेट प्रथम; कलापिनीत कै.बाळासाहेब गद्रे नाट्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न








मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे, दि. २७ /१/२०२६ कलापिनी व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, तळेगाव दाभाडे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै.बाळासाहेब गद्रे नाट्यवाचन स्पर्धा – २०२६ उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचे हे २० वे वर्ष होते. शालेय, शिक्षक आणि खुल्या गटात खेड, मावळ. पिंपरी- चिंचवड विभागातून स्पर्धा संपन्न झाली. पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी उपस्थित होत्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, अध्यक्ष विनायक अभ्यंकर, श्रीशैल गद्रे, स्पर्धेचे परीक्षक नरेंद्र लवाटे, कृष्णा वाळके, मंजिरी धामणस्कर, नाट्य परिषदेचे संजय वाडेकर, नितीन शहा, विदुर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा आणि स्पर्धक अत्यंत दर्जेदार असून नेटक्या संयोजनाचे मान्यवर परीक्षकांनी कौतुक केले.अ.भा.नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी कलापिनीच्या विविध उपक्रमात नेहमी बरोबर राहू असे सांगितले. मृणाल कुलकर्णी यांनी कलापिनीमध्ये वर्षभर होणाऱ्या उपक्रमांची प्रशंसा केली आणि विविध कलाकार नावारूपाला येत आहेत त्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पालकांनी आपल्या पाल्याच्या कलागुणांना वाव द्यावा असे सांगितले. परीक्षक मंजिरी धामणस्कर यांनी स्पर्धकांनी विषयांची निवड विचार करून करावी, स्वतः लिहिण्याची सवय लावावी असे सांगितले. नरेंद्र लवाटे यांनी नवीन विषय जरूर घ्यावेत असे सांगून कलापिनी परिवाराचे उत्तम नियोजनाबाबत कौतुक केले. कृष्णा वाळके यांनी प्रादेशिक भाषेतल्या संहितांचा अभ्यास करून सादर कराव्यात असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनंत परांजपे यांनी तर स्वागत विनायक अभ्यंकर यांनी केले. आभार विनायक भालेराव यांनी मानले. पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन डॉ. विनया केसकर आणि स्पर्धा प्रमुख अशोक बकरे यांनी केले. शालेय गटाचे परीक्षण हर्षल आल्पे आणि मुकुल ढेकळे यांनी तर शिक्षक गटाचे परीक्षण राजेंद्र पाटणकर यांनी केले. सुमेर नंदेश्वर यांनी ध्वनी संयोजन केले. “कलापिनीच्या नाट्यवाचन स्पर्धेने मला काय दिले?” या विषयावर आयोजित चर्चासत्र अतिशय रंगले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रुपाली पाटणकर, ऋचा पोंक्षे, लीना परगी, दिपाली जोशी, मीरा कोन्नूर, स्मिता दिवेकर, पांढरे काकू, दिप्ती आठवले, भाग्यश्री हरहरे, केतकी लिमये, नीता धोपाटे, किसन शिंदे पांडुरंग देशमुख आणि महिला मंच, स्वास्थ्ययोगाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.शालेय गट निकाल पत्र सांघिक प्रथम – कणकणमे भारत बसता है, आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे.सांघिक द्वितीय – झूss ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी.सांघिक तृतीय – काही झालं तरी थांबायचं नाय, ज्ञानवर्धिनी विद्यालय ,चाकण .उत्तेजनार्थ :-मायेची झालर, डी आय सीज स्कूल, निगडी. खोट्याच्या कपाळी गोटा, सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव दाभाडेलेखन प्रथम – कणकणमे भारत बसता है., आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे.लेखन द्वितीय :- स्वच्छता आपल्या दारी, सह्याद्री इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे.दिग्दर्शन प्रथम – प्रतीक्षा ढवळे/ सुजाता डावखरे , कणकण मे भारत बसता है. आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे.दिग्दर्शन – द्वितीय झूss, स्वाती मोरे , ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी.वाचिक अभिनय मुले -प्रथम – श्रेयस सुभाष महाले, भूमिका आदिवासी मुलगा , आजोबा. कणकण मे भारत बसता है, आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे.द्वितीय – हर्ष अशोक कराड,भूमिका मॉनिटर व बाळू, खोट्याच्या कपाळी गोटा, सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे .तृतीय – ऋग्वेद किरण अराणके, मुलगा व महाराज, स्वच्छता आपल्या दारी, सह्याद्री इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे. उत्तेजनार्थ अन्वय सुमित धोपाटे, भूमिका अन्वय, कणकण मे भारत बसता है ,आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे. श्रीहरी नवनाथ टिळेकर ,भूमिका रोबो व निमिश ,यंत्राची कमाल विज्ञाची धमाल , नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे. वाचिक अभिनय मुली प्र.- काव्या किरण बोरकर, भूमिका सिंहिणी, झूss, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी. द्वि.- गार्गी कारंडे , भूमिका- लता व म्हादबा, मायेची झालर, डी आय सीज इं. स्कूल निगडी.तृ. – स्वरा गणेश रेपाळे, भूमिका लताबाई, काहीही झालं तरी थांबायचं नाय, ज्ञानवर्धिनी विद्यालय, चाकण. उत्तेजनार्थउत्कर्षा सचिन अडसूळ ,भूमिका गीता, सीमा, आई व ठकू. खोट्याच्या कपाळी गोटा, सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे .साक्षी शिवाजी गुरव ,भूमिका तानाजी, गड आला पण सिंह गेला ,ज्ञानवर्धिनी विद्यालय चाकण. अस्मि देशमुख, भूमिका आई ,मी तुझ्या जागी असते तर, सिटी प्राइड इं. स्कूल,निगडी.शिक्षक गट निकाल पत्र सांघिक प्रथम – स्नेहसंमेलन,डी आय सीज इं. स्कूल निगडी .सांघिक द्वितीय – लग्नाचा पन्नासावा वाढदिवस, श्री साईनाथ बालक मंदिर, चिंचवड. सांघिक तृतीय – चिमणा बांधतो बंगला ,आदर्श विद्यामंदिर, तळेगाव दाभाडे उत्तेजनार्थ – नळावरची भांडण, सह्याद्री इंग्लिश स्कूल ,तळेगाव दाभाडे. लेखन प्रथम – सौ चित्रा देशपांडे, स्नेहसंमेलन, डी आय सीज इंग्लिश स्कूल , निगडी . लेखन द्वितीय सौ निशा बेलसरे लग्नाचा पन्नासावा वाढदिवस, श्री साईनाथ बालक मंदिर, चिंचवड. दिग्दर्शन प्रथम -सौ निशा बेलसरे लग्नाचा पन्नासावा वाढदिवस, श्री साईनाथ बालक मंदिर चिंचवड . दिग्दर्शन द्वितीय – सौ प्रतीक्षा ढवळे / सौ सुजाता डावखरे, चिमणा बांधतो बंगला, आदर्श विद्या मंदिर ,तळेगाव दाभाडे वाचिक अभिनय पुरुष – श्री रवींद्र जालिंदर घोजगे, भूमिका – गण्या व डॉक्टर, नळावरची भांडणं, सह्याद्री इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे वाचिक अभिनय स्री ऋतुजा रुपेश सावंत, भूमिका म्हातारी, नळावरची भांडणं, सह्याद्री इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे.सौ प्रतीक्षा प्रवीण ढवळे, भूमिका कुसुम ,चिमणा बांधतो बंगला, आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे .स्वाती जगदीश कुलकर्णी, भूमिका माई व गुरुजी, लग्नाचा पन्नासावा वाढदिवस, श्री साईनाथ बालक मंदिर, चिंचवड. उत्तेजनार्थ सौ गायत्री जोशी, भूमिका देसाईबाई, स्नेहसंमेलन, डी आय सी इंग्लिश स्कूल, निगडी सौ सुजाता सचिन डावखरे, भूमिका वसंतराव चिमणा बांधतो बंगला, आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे.खुला गट सांघिकप्रथम – आदिम, तळेगाव दाभाडे एकांकिका – कॉफी डेट.द्वितीय – चिंतामणी, चिंचवड, एकांकिका – मराटी. तृतीय – रंगभूमी थिएटर्स दि नोव्हॅलीस्ट.उत्तेजनार्थ प्रतिबिंब, आजोबांचं जाणं.विटामिन ए, तळेगाव दाभाडे – बंधमुक्त वंदिसी, तळेगाव दाभाडे – मोकळे आकाश. लेखन प्रथम – अपर्णा महाजन, कॉफी डेट, आदिम, तळेगाव दाभाडे. द्वितीय- ज्ञानेश दातीर,मराटी, चिंतामणी ,चिंचवड.उत्तेजनार्थ – विद्या मुळे /सीमा जोशी,मोकळे आकाश ,वंदीसी, तळेगाव दाभाडे.दिग्दर्शन प्रथम – अमेय कुलकर्णी, मराटी, चिंतामणी चिंचवड. द्वितीय – विराज सवाई, कॉफी डेट, आदिम, तळेगाव दाभाडे.वाचिक अभिनय पुरुष – प्रथम – विनायक लिमये, भू. -जयदीप, कॉफी डेट, आदिम, तळेगाव दाभाडे.द्वितीय- माधव जोगळेकर,भू.- आण्णा, मराठी, चिंतामणी , चिंचवड. तृतीय – ऋषिकेश खांबेटे, भू.- दिलीप,दी नॉव्हेलीस्ट, रंगभूमी थिएटर्स चिंचवड. उत्तेजनार्थ विराज सवाई, भू.- हेमंत, कॉफी डेट, आदिम, तळेगाव दाभाडे. श्रावण डाखोळे, भूमिका नरोत्तम, एकांकिका बेगम, कला साम्राज्य चिंचवड.वाचिक अभिनय स्री प्रथम – अपर्णा महाजन, भू.- सुषमा, कॉफी डेट, आदिम, तळेगाव दाभाडे. द्वितीय- मीरा मयूर भरड, भू.- मीरा, बंधमुक्त, विटामिन ए, तळेगाव दाभाडे. तृतीय – पूजा डोळस, भूमिका पूजा, बंधमुक्त, आदिम, तळेगाव दाभाडे. उतेजनार्थमधुवंती रानडे, भू.- राधाबाई, एकांकिका नवी सून, कलापिनी महिला मंच, तळेगाव दाभाडे. दीप्ती आठवले, भू.- कुटुंब, एकांकिका- कुटुंबाच्या लग्नाचा रोप्य महोत्सव, कलापिनी स्वास्थ्य योग, तळेगाव दाभाडे. नभा बी. भू.- वर्षा,माधवी, एकांकिका – दी नॉव्हेलीस्ट, रंगभूमी थिएटर्स चिंचवड. प्रोत्साहनपर बक्षिसे निषाद चौधरी, भूमिका निषाद, ना.- बंधमुक्त, व्हिटामिन एक, तळेगाव दाभाडे. ईरा शांडिल्य, भूमिका – मोना,नाटक – आजोबांचं जाणं, प्रतीबिंब, तळेगाव दाभाडे.



