लायन्स क्लब लोणावळा-खंडाळा झोन चेयरमन भेट व UPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या शुभम वाघमारेचा गौरव







मावळ मराठा न्युज -लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा यांच्या वतीने नुकताच लायन्स क्लब इंटरनॅशनल चे जनक मेल्वीन जोन्स यांचे जन्म दिवसाचे अवचित साधत चार्मी पारेख यांनी माहिती दिली तसेच झोन चेअरमन यांची अधिकृत भेट व मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकू उत्सव यांचे अवचित साधत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात UPSC (CGSE Hydrogeologist & Scientist B) आणि MPSC परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केल्याबद्दल वळवण, लोणावळा येथील रहिवासी शुभम वाघमारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणारे शुभम हे लोणावळ्याचे पहिले नागरिक ठरले आहेत. त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल लायन्स क्लबच्या वतीने त्यांना स्मृतीचिन्ह देऊन झोन चेअरमन MJF देवल पारेख, लायन्स क्लब लोणावळा-खंडाळाच्या अध्यक्षा कांता ओसवाल यांनी त्याचे उज्ज्वल यशाचे यथोचित कौतूक करून गौरविण्यात आले. सत्काराला उत्तर देताना शुभम वाघमारे यांनी आपल्या यशाचा प्रवास उलगडला तसेच पी .एचडी करत आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले आणि भविष्यात UPSC परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन आणि मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी झोन चेअरमन MJF लायन देवल पारेख यांच्या अधिकृत भेटीचे औचित्य साधून क्लबचे माजी सर्व अध्यक्ष यांचा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला झोन चेअरमन MJF देवल पारेख, लायन्स क्लब लोणावळा-खंडाळाच्या अध्यक्षा कांता ओसवाल, सचिव नीराली नालेकर हिने कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले, खजिनदार अश्विनी कदम, जिल्हा उपक्रम अध्यक्ष डॉ. पोपट ओसवाल आणि क्लबचे इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वीरेंद्र पारेख यांनी केले.



