नांगरगाव प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी कार्यतत्पर नगरसेवक सुभाष डेनकर यांनी जनता दरबारात जाणून घेतल्या समस्या आणि केली प्रत्यक्ष नाल्याची पाहणी







मावळ मराठा न्युज दिनांक१ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी लोणावळा नगरपरिषद नांगरगाव प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक सुभाषभाऊ डेनकर ह्यांनी नांगरगाव भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार बोलावला होता . सदर जनता दरबारात लोणावळा नगरपरिषदचे नवनिर्वाचित बांधकाम सभापती सनीभाऊ दळवी हे देखील यावेळी उपस्थित होते . सदर प्रसंगी राज्याचे स्वर्गीय मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि नांगरगावचे नागरिक कै.सुभाषभाऊ दळवी ह्यांना या जनतादरबारात श्रद्धांजली वाहण्यात आली .ह्यावेळी उपस्थित नागरिकांनी आपापल्या प्रभागातील समस्या मांडल्या . यावेळी सर्वप्रथम पावसाळ्यापूर्वी नाल्याचे काम याला प्राधान्य देऊन ते जलद गतीने करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले . प्रभागातील नगरसेवक सुभाष भाऊ डेनकर आणि बांधकाम सभापती सनी भाऊ दळवी यांनी त्या भागातील नागरिकांना सदर काम त्वरित केले जाईल अशी ग्वाही देऊन नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली .



