लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष सुमंत डेनकर महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२५ ने सन्मानित

मावळ मराठा न्युज -पुणे,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदुत संघटना, लॉयन्स अग्रसेन क्लब, डॉ. आदित्य पतकराव यूथ फाउंडेशन, पोलिस मित्र, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण सेना, ऑल इंडिया अँटी करप्शन, पार्लमेंट कमिटी, भारतीय महाक्रांती सेना, क्राईम प्रिवेंशन अॅन्टी करप्शन कमिटी, छत्रपती शेतकरी सेना, युवा महाराष्ट्र फाउंडेशन, मानव परिवर्तन विकास व बहू उद्देशीय सेवा भावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा नुकताच पुण्यातील जंगली महाराज रोड जवळील बाल गंधर्व रंग मंदिरात संपन्न झाला. यावेळी लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष सुमंत डेनकर यांना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे,सरचिटणीस गणेश विटकर आणि उपस्थित प्रमुख पाहुणे,विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page