*लायन्स पॉईंट येथे पुन्हा एका युवकाची आत्महत्या*








मावळ मराठा न्युज -लोणावळा,शिवदुर्गने फूट खोल दरीतून मृतदेह शोधून वर काढला . गुरुवार दि. १२ फेब्रु २६ रोजी पहाटेच्या दरम्याने विरेंद्र सिन्हा वय ३२ राहणार पुणे जो बाणेर येथील एका आय टी कंपनीत कामाला होता त्याने आत्महत्या केल्याचा संशय होता . कारण सकाळी त्याची चारचाकी गाडी लायन्स पॉईंट येथे पार्क केलेली आढळली . व त्याने येथूनच त्याच्या मित्रांना व पत्निला मेसेज व मेल द्वारे याबाबत पहाटेच कळवले असल्याचे समजले . मिळालेल्या माहितीच्या आधारे येथील दरीत शोध सुरु केला असता ज्या ठिकाणी त्याने गाडी पार्क केली होती तेथील समोरील दरीत साधारण २५० फूटांवर विरेंद्र सिन्हा याचा मृतदेह आढळला . साधारण संध्याकाळी ४.३० च्या सुमारास मृतदेह वर काढून पोलीसांच्या स्वाधिन केला . शिवदुर्ग टिम मध्ये योगेश उंबरे,महेश मसने,आयुष वर्तक,आयुष पवार,देवश्री चिले,सचिन गायकवाड,कुणाल कडू,कपिल दळवी,योगेश दळवी,सागर दळवी,सागर कुंभार,अनिल आंद्रे,गणेश भांगरे,पिंटू मानकर,महादेव भवार,गणेश म्हसकर,ज्ञानेश्वर आखाडे,संतोष मरगळे,चंद्रकांत गाडे,आनंद गावडे सहभागी होते.



