लोणावळा महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने श्रीक्षेत्र देहू आळंदी,भंडारा डोंगर,वढू बुद्रुक व तुळापूर या ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजन

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट्च्या डॉ. बी एन पुरंदरे कला, श्रीमती एस, जी. गुप्ता वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोणावळा. येथील मराठी विभागाच्या वतीने दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी अभ्यासक्रमात समाविष्ट असणाऱ्या संत साहित्याचा प्रत्यक्ष परिचय व्हावा या दृष्टिकोनातून संत तुकाराम महाराज यांची कर्मभूमी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर व श्रीक्षेत्र देहू तसेच श्रीक्षेत्र आळंदी या ठिकाणी असणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या समाधीस व छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस प्रत्यक्ष भेट देण्यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराज ज्या ठिकाणी ज्ञानसाधना करायचेत्मा ठिकाणांना भेटी दिल्या. याप्रसंगी श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट्च्या वतीने विद्यार्थ्यांना भंडारा डोंगराचे महत्त्व व लोकवर्गणीतून या ठिकाणाचा महत्वपूर्ण सुरु असलेला विकास या संबंधी माहिती दिली. तसेच श्री क्षेत्र देहू या ठिकाणी विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण, तुकाराम महाराजांचे मंदिर शिळा मंदिर, संत तुकाराम महराजांचे हस्तलिखित व गाथा मंदिर यांचे महत्त्व प्रत्यक्ष समजावून घेतले. श्रीतीर्थक्षेत्र आळंदी क्षत्रिय भेटप्रसंगी श्री शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व संत साहित्याचे अभ्यासक व प्रसिद्ध, कीर्तनकार डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी आळंदीचे महत्त्व महिमा व श्रेष्ठत्वश्या विषयावर समाधीमंदिर परिसरात अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. या प्रसंगी त्यांनी संत ज्ञानेश्वर यांनी आळंदी हे ठिकाण समाधीसाठी का निवडले याचे विस्तृत विवेचन केले. तसेच सुवर्ण पिंपळ, श्री संत एकनाथ महाराज यांचे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण असणारे योगदान, इंद्रायणी नदीच्या संदर्भातले पौराणिक संदर्भ व एकूणच श्री क्षेत्र आळंदी येथे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस भेट देण्यासाठी वढू बुद्रुक व तुळापूर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट दिली. शैक्षणिक सहलीचे आयोजणामुळे विधार्थ्यांच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल व मराठी साहित्याच्या अभ्यासाची आवड निर्माण होईल असा विश्वास डॉ. राजेंद्र देवरे व सहकारी प्राध्यापकानी समारोपप्रसंगी व्यक्त केला. या एकदिवसीय शैक्षणिक सहलीत विधार्थ्यांनी मोठ्या संखेने सहभाग घेतला. या शैक्षणिक सहलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र देवरे, प्रा. संतोष शिंदे, प्रा. ज्ञानदेव रणशूर प्रा. भारती राजेभोसले, सौ. चांगुना ठाकर-येवले व मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहल यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page