गोंदवले यांना अर्थसाक्षरता बद्दल डीलिट पदवी प्रदान


मावळ मराठा न्यूज :-पिंपरी(प्रतिनिधी) आर्थिक साक्षरता प्रशिक्षक आकाश गोंदावले यांना आय इ एम एस या अमेरिकन इंस्टिट्यूट चा ऑनररी डॉक्टरेट इन फायनानशियल लिट्रेसी (आर्थिक साक्षरता) हि पदवी बहाल करण्यात आली. द मनी अकॅडमीच्या माध्यमातून आकाश गोंदवले हे गेल्या २२ वर्षापासून आर्थिक साक्षरता विषयक जनजागृती करीत आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून हजारो लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती झाली.या उल्लेखनीय कामगिरिबद्द्ल त्यांना महाराष्ट्र रत्न ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा मुंबई येथे हयात सेंट्रिक जुहू येथे पार पडला. यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेत्री इशा कोपीकर,आदिती गोवित्रिकर माजी मंत्री कृपाशांकंर सिंग,शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर या मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी आकाश गोंदावले म्हणाले माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सन्मान मला मिळतोय यापुढे अजुन काम करण्याची प्रेरणा मिळाली तसेच आजपर्यंत त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत ज्यांचे ज्यांचे योगदान आहे आशा सर्वांचे देखील आभार यावेळी त्यांनी व्यक्त केले.




