नांगरगाव प्रभागातील सुरैया ब्रीज वरून टाकण्यात येणाऱ्या पाणी वितरण नलिका टाकण्यात येवू नये- भाजप नगरसेवकांचा इशारा

मावळ मराठा न्यूज:- लोणावळा, नांगरगाव प्रभागातील सुरैया ब्रीज वरून टाकण्यात येणाऱ्या पाणी वितरण नलिका टाकण्यात येवू नये असा इशारा लोणावळा नगरीच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि माजी उपनगरध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना लेखी पत्राद्वारे दिला आहे. सदर ब्रीज रुंदीकरण करण्याचा ठराव तत्कालीन सत्ताधारी भाजप यांनी लोणावळ्यातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी सुरैया ब्रीज पाडून त्याचे रुंदीकरण व्हावे जेणेकरून वाहतूक समस्या बऱ्यापैकी कमी होईल परंतु लोणावळा नगरपरिषद सदर सुरय्या पुल सुरक्षा कुंपणाच्या आतून पाणी वितरण नलिका टाकण्याचा विचारात असल्याचे दिसते.तसे झाल्यास पुलाची रुंदी कमी होईल आणि टाकलेल्या नालिकांवरून वाहनांचा त्यावर आदळून अपघात तर होईलच शिवाय नलिका सारख्या नादुरुस्त होवून पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची जास्त शक्यता असल्याचे सुरेखा जाधव आणि श्रीधर पुजारी यांनी लोणावळा नगरपरिषदेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सुरय्या पुलाचे आतून संरक्षक कुंपणाच्या आतून पाणी वितरण नलिका टाकण्यात येवू नये अन्यथा भाजप तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page