आयटॅपच्या १२१ विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार


मावळ मराठा न्यूज :- पिंपरी(प्रतिनिधी) पुण्यातील सुप्रसिद्ध आय टॅप या संस्थेच्या वतीने नोकरी विषयक नुकत्याच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या ९० दिवसात आयटॅपच्या वतीने १२१ तरुणांना कॉमर्स क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली. नोकरी मिळालेले हे विद्यार्थी त्यांचे पालक व इतर गरजू विद्यार्थ्यांसाठी, पत्रकार भवनात विद्यार्थी सत्कार व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर आणि कॉमर्स क्षेत्रातील तज्ञ डॉ. नवनीत मानधनी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी बोलताना श्री वेलणकर म्हणाले की, कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली तर त्यांना मोठी संधी आहे, झटपट श्रीमंती व मोठ्या मागे जाऊन विद्यार्थी चूक करतात. एकाच ठिकाणी सातत्याने चांगले काम करणे हेच यशाचे गमक आहेउद्योगाची गरज ओळखून, त्यांना कसे मनुष्यबळ हवे आहे , याचा अचूक अंदाज बांधून आयटॅप ने तयार केलेल्या अभ्यासक्रमाचे, तसेच विद्यार्थ्याना चांगली नोकरी मिळवणयासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केलेडॉक्टर नवनीत मानधनी यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. वेळेचे नियोजन, स्वयंशिस्त चिकाटी आणि मेहनत यांचा विद्यार्थ्यांना किती फायदा होतो हे त्यांनी स्पष्ट केलेनोकरी मिळालेले विद्यार्थी तसेच त्यांचे पालक याचबरोबर ज्यांनी विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली आहे असे उद्योजक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आयटॅपचे संस्थापक संचालक सीए पंकज मानधने यांनी संस्थेची उद्दिष्टे आणि आत्तापर्यंत केलेले काम याचा विस्तृत आढावा घेतला. आयटॅप ही संस्था गेली १४ वर्षे पुण्यात कार्यरत आहे संस्थेच्या वतीने आत्तापर्यंत दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेमार्फ़त नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिकण्यासाठी आयटॅपमध्ये येतात. यातील कित्येकविद्यार्थी आज महीना एक लाखापेक्षा जास्त पगार कमावतात.




