लोणावळा महाविद्यालयचे १९८६ ते ९२ बॅचच्या माजी विद्याथ्यांचे मैत्र जीवाचे-पाचवे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न








मावळ मराठा न्यूज – लोणावळा दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आर्टस अँड कॉमर्स कॉलेज लोणावळा येथे १९८६ ते ९२ च्या बॅचच्या माजी विद्याथ्यांचे मैत्र जीवाचे-पाचवे स्नेह संमेलन उत्साहात पार पडले! या स्नेह .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे आदरणीय प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख सरांनी या स्नेह मेळाव्यास शुभेच्छा दिल्या व उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ,आज प्रेम ,जिव्हाळा हि प्रत्येकाला हवी असणारी गरज आहे व ती भेटीतून आपल्याला भेटू शकते .आदरणीय निवृत क्रीडा शिक्षक श्री दिलीप महाजन सरांनी देखील दरवर्षा प्रमाणे आपला सहभाग व्यक्त केला.२०१८ पासून माजी विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला.सर्व माजी विद्यार्थ्यांना शोधून ग्रुप बनवला व आज पर्यंत १५० विद्यार्थ्यांचा ग्रुप एकत्र आला.या माजी विद्यार्थी मध्ये १२ नामांकित वकील,शिक्षक,व्यापारी,सरकारी खाजगी नोकरी करणारे दरवर्षी एकत्र येतात व आपल्या आठवणी ताज्या करतात.आठवणी, नाच गाणी, मनोरंजन खेळ व स्नेहभोजन आयोजित केले जाते.सर्व मित्र-मैत्रिणीच्या सहकार्याने हा स्नेह मेळावा उत्कृष्टरित्या पार पाडला.



