कोथुर्णे घटनेतील आरोपीला फाशी तर आरोपीच्या आईला ७ वर्षाचा कारावासाची शिक्षा,ग्रामस्थ यांनी मानले डॉ. नीलम गोऱ्हे नि पोलिसांचे आभार

मावळ मराठा न्युज:- मावळ,दि.२२: कोथूर्णे तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला पुणे न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीच्या आईला ७ वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाठपुरावा केला होता. या केस मधील गांभीर्य लक्षात घेवून उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक श्री रजनीश शेठ यांना लेखी निवेदन देवून आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच या तपासाबाबत लक्ष घालून आरोपीस कडक शिक्षा व्हावी म्हणून तपास ही व्यवस्थित करावा असे निर्देश दिले होते. त्यानुसार श्री रजनीश शेठ यांनी योग्य तपासाबाबत चौकशी अधिकारी यांना सूचना दिल्या. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.या प्रकरणामध्ये आज जिल्हा सत्र न्यायालयात श्री बी पी क्षीरसागर यांनी पोक्सो अंतर्गत आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात आली आहे व सहआरोपी सुजाता दळवी हिस ७ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली असल्याचा निकाल जाहीर केला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप यांनी केला व अतिरिक्त सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया यांनी काम पाहिले आहे. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे व पोलीस प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेबाबत आभार मानले आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page