अमेरिका इस्राईल-इराण युद्धाचा फटका महाराष्ट्रातील छोट्या व्यावसायिक आणि पथ विक्रेत्यानाच;त्यांचेवर उपासमारीची पाळी,त्यांना शासन मदतीची गरज







मावळ मराठा न्युज – जवळ पास गेली १० दिवस झाले अमेरिका इस्राईल -इराण यांच्यात युद्ध सुरु आहे. त्यामुळे या युद्धाचा परिणाम म्हणून पहिला झटका,महाराष्ट्रातील छोटे व्यावसायिक,पथ विक्रेते यांना बसला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महापालिकेचे दैनंदिन शुल्क भरायचे कसे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यावसाईक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद करण्याचा सरकारकडून डिलर्सना आदेश दिला आहे. युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागल्याने व्यवसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा काही दिवसापासून थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती वापराचा गॅस पुरवठा लोकांना व्यवस्थित होत राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.असे कंपनीने सांगितले आहे.असे स्थानिक एजन्सी सांगतात. पुण्यातील बीपीसीएलच्या शिक्रापूर इथल्या प्लांटमध्ये आणि चाकण मधील एचपीसीएलच्या प्लांटमध्ये व्यावसायिक वापराचे सिलेंडर देणं बंद करण्यात आलं आहे.डीलर्सनी व्यवसायिक वापराच्या सिलेंडर्ससाठी गाड्या पाठवू नयेत अशा सुचना त्यांना देण्यात आल्या आहेत. पुणे शहरात ५२५ अधिकृत व्हेंडिंग झोन मधे अंदाजे २५ हजार पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.मात्र दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने, व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय उरला नाही.ही माहिती नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर इंडिया,महाराष्ट्र चे सदस्य दिपक मोहिते यांनी दिली आहे. व्यवसायिक वापराचा सिलेंडर ५,१९,३५,४७ आणि ४२७ किलो अशा वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध असतो. हॉटेल्स व इतर छोटे व्यवसायिक,पथ विक्रेते हे अन्नपदार्थ करण्यासाठी १९ Kg व ५ Kg च्या व्यवसायीक सिलेंडर चा वापर केला जातो.सरकारने ह्या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करावी.ही मागणी मोहिते यांनी केली आहे.त्यामुळे अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या छोट्या व्यावसायिक आणि पथ विक्रेत्यांचा पाठीशी ठाम उभं राहून महाराष्ट्र शासनाने त्यांना याकाळात मदतीचा हात दिला पाहिजे अन्यथा त्यांचेवर मोठे आर्थिक संकट येऊन युद्ध अजून असेच सुरु राहिल्यास उपासमारीची पाळी त्यांचेवर येणार आहे. तरी नगरपालिका, महापालीका यांना त्यांच्या हद्दीतील पथ विक्रेते आणि छोटे व्यावसायिक यांना आदेश देण्यात यावे. अशी अपेक्षा छोटे व्यवसाईक व्यक्त करीत आहेत.



