चाकण एमआयडीसी उद्योजक संघटना आयोजित एमआयडीसी प्रीमियर लीग क्रिकेट जियाताई कप जिंकला अल्ट्रा टायटन्सने

मावळ मराठा न्यूज:- चाकण, सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे व क्रिकेट मैदानाचे पूजन करून पार पडला. आपल्या मनोगतामध्ये साने म्हणाले की चाकण एम आयडीसी उद्योजक संघटना हे अशा प्रकारचे उपक्रम नेहमीच घेत असते व त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील सामाजिक कार्यात संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, संचालक प्रवीण शिंदे व संघटनेचा मोलाचा वाटा असतो.एकूण १२ कंपन्यांच्या टीम्स या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. २३ जानेवारी २०२३ रोजी ६ टीम्स व २४ जानेवारी २०२३ रोजी दुसऱ्या ६ टीम्स एकमेकांशी भिडल्या. या एकूण १२ टीम्स मधून ८ टीम्स या पूर्व उपांत्य फेरीत पात्र ठरल्या. व त्या नंतर उपांत्य फेरी मधून ४ टीम्स या अंतिम फेरीत दाखल झाल्या. अंतिम सामना हा अल्ट्रा टायटन्स विरुद्ध एसबीआर स्ट्रायकर्स मध्ये रंगला. यात अल्ट्रा टायटन्सने बाजी मारून अव्वल किताब पटकावला. एसबीआर स्ट्रायकर्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.तर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या मॅच मध्ये सिद्धकला वॉरियर्स विरुद्ध बीएसपी ब्लास्टर्स हा सामना देखील अतिशय छान रंगला त्यात बीएसपी ब्लास्टर्सने बाजी मारली.बक्षीस वितरण सोहळ्यासाठी शेकडो उद्योजकांची मांदियाळी उपस्थित होती. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर योगेश बहल, जेटाई लेझर कंपनीचे हरप्रीत सिंग व त्यांची टीम, अल्ट्रा कॉर्पोरेट कंपनीचे संचालक अशोक भोसले, बोडोर लेजरचे पदाधिकारी, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नामदेव पोटे, नेत्रा सेल्सचे नितीन खाटेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेवजी अक्कलकोटे यांनी आपल्या समारोपणाच्या भाषणामध्ये सांगितले की सदर स्पर्धा ही मालक व कर्मचारी यांच्यामधील दरी कमी करण्याकरिता दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो, पुढच्या वेळेला याहून भव्य दिव्य स्वरूपामध्ये ही स्पर्धा होणार आहे. याप्रसंगी माजी महापौर योगेश बहल व अल्ट्रा कॉर्पोटेकचे अशोक भोसले यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेबद्दल व नियोजनाबद्दल कौतुक केले. अशोक भोसले यांनी तिन्ही विजेत्या टीम्स, बेस्ट बॅालर, बेस्ट बॅट्समन, आदी बेस्ट खेळाडूंना लाखो रुपयांचे पारितोषिक दिले.सदर स्पर्धा आयोजित करण्यामध्ये मुख्य संयोजक निखिल देशमुख, सीए ऋषी खळदकर, प्रवीण शिंदे यांनी सिंहांचा वाटा उचलला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page