लोणावळ्यात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळ्याचे त्वरित लोकार्पण करावे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांचेकडे सकल मातंग समाज व शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने साकडे







मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळा नगरपरिषद नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या कार्यालयामध्ये इतर महापुरुषांचे फोटो आहे.परंतु त्या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा फोटो भेट देण्यात आला. यावेळी समाजाचे जेष्ठ नेते नाना रोकडे. नामदेवजी खवळे,मातंग समाजाचे उद्योजक दयानंद कांबळे,भीमा गणपत मोरे, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव अध्यक्ष तथा शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष कृष्णा दादा साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा देत असताना बंद खोलीत असलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा लवकरात लवकर त्यांच्या निश्चित अशा या ठिकाणी बसवून लोकार्पण करावा अशी आग्रहाची विनंती कृष्णा साबळे यांनी सभागृहात नगराध्यक्षांना केली.



