परंदवाडी येथे कासवाचे २२ अंडी

मावळ मराठा न्युज- मावळ,७ मार्च २०२५ रोजी हरी बोल नर्सरी, परंदवाडी येथे कासवाचे २२ अंडी मिळून आली. यांची माहिती दिपक महाजन यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद निनाद काकडे यांना कळवले. निनाद काकडे आणि अनुभव रणपिसे यांनी अंडी ती रेस्क्यू करून कृत्रिमरित्या उबवण्यासाठी ठेवली होती. सदर लेईथ्स सॉफ्टशेल टर्टल यांचे शास्त्रीय नाव (Nilssonia leithii)  “वाइल्डलाइफ प्रोटेक्शन ऍक्ट १९७२ मधील schedule 1 species आहे. IUCN Red List मध्ये critically endangered species आहे”.काल ७ एप्रिल रोजी अंड्यातून २० पिल्ले बाहेर आली व  २ अंडी ही नापीक आहेत. २० पिल्ले यांची प्राथमिक पाहणी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे,जिगर सोलंकी, निनाद काकडे आणि वनविभाग वडगाव चे वनरक्षक योगेश कोकाटे यांनी केली आणि सर्व पिल्ले हे स्वस्थ असून त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ प्रकाश शिंदे, वनपाल एम. हिरेमठ व वनरक्ष योगेश कोकाटे यांच्या मार्फत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळून आल्यास जवळ पास च्या प्राणीमित्र ला किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे ९८२२५५५००४ आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना केले आहे.कासव हे पर्यावरणीय संतुलन टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्राणी आहेत. ते जलीय पर्यावरणाची स्वच्छता राखण्यात मदत करतात तसेच अन्नसाखळीतील विविध स्तरांचा भाग असतात. कासवांचा प्रजातींच्या संवर्धनासाठी आणि परिसंस्थेतील जैवविविधतेसाठी अनमोल वाटा आहे. मावळ तालुक्यात हे कासव खूप जास्त प्रमाणात आढळून येतात. हे सॉफ्टशेल टर्टल मधला एकच असा कासव आहे जो फक्त भारतातच आढळून येतो. भारतीय कोणता ही कासव पाळण्यात सक्त मनाई आहे. त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोणत ही जखमी वन्य प्राणी आढळल्यास त्वरित वनविभागाला कळवा.- प्रकाश शिंदे(वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ)

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page