तळेगांव जवळ घोडीला अपघात झाल्याने मागच्या दोन्ही पायांना दुखापत,वन्यजीव रक्षक संस्था धावली मदतीला


मावळ मराठा न्यूज – तळेगांव,तळेगाव जवळ रोडवर अपघातात घोडीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने घोडीच्या मागच्या दोन्ही पायांना मार लागल्यामुळे घोडीला उठता येत नाही त्यामुळे तिच्या मदतीला वन्यजीव संस्था रेस्क्यू टीम, तळेगाव दाभाडे, ता. मावळ जिल्हा पुणे, धावून आली. वन्यजीव रक्षक संस्था रक्षक मावळ अध्यक्ष श्री निलेश गराडे यांचा मार्गदर्शनाखाली जुन्या हायवे वरती सीआरपीएफ च्या पुढे पुणे बाजूला एका अज्ञात वाहनाने घोडीला धडक दिली. घोडीच्या मागच्या दोन्ही पायांना मार लागल्यामुळे घोडीला उठता येत नाही त्या घोडीच्या उपचार करण्यासाठी गोशाळा टिमचे शेखर गराडे, रुपेश गराडे,वन्यजीव संस्था टीम निलेश भाऊ गराडे व स्थानिक गोसेवक आणि तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक भडकवाड व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने घोडी पुढील उपचारासाठी रेस्क्यू सेंटर भुगाव या ठिकाणी उपचारासाठी पाठवले आहे.




