व्ही.पी.एस इंग्लिश स्कूल,लोणावळा येथे जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्साहात साजरी

मावळ मराठा न्युज – लोणावळा,विद्या प्रसारिणी सभा,पुणे येथील व्ही.पी.एस इंग्लिश टिचींग स्कूल,लोणावळा मध्ये दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.पारंपरिक गणवेशात असलेले विद्यार्थी श्रीकृष्ण व त्यांच्या सवांगड्यांच्या वेशभुषेमध्ये आले होते.सुरवातीला श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी चे गीत व नृत्य सादर केले.त्यानंतर सर्व बाल गोपलांनी दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला.कार्यक्रमाची सांगता सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करून करण्यात आली.या दहीहंडी सोहळ्याचे नियोजन मुख्याध्यापिका सौ.भारती लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.सूत्रसंचालन सौ. निकिता दिघे यांनी केले.तसेच शिक्षक शिक्षकेतर यांनी या दहीहंडी सोहळ्यासाठी सहकार्य केले.संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सौ.मृणालिनी गरवारे मॅडम,कार्यवाह डॉ.श्री.सतीश गवळी सर,सहकार्यवाह श्री.विजय भुरके सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page