मावळ मराठा न्यूज :पुणे,मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तीस हजार रुपयाची लाच घेताना, पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे


याप्रकरणी तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सापळा लावून सिमोन साळवी यांच्यामार्फत तीस हजार रुपयाची लाच घेताना पकडले.पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस कर्मचारी दीपक प्रल्हाद क्षीरसागर आणि सामान्य व्यक्ती सिमोन अविनाश साळवी अशी दोघांची नावे आहेत. तक्रारदाराच्या भावाला मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस कर्मचारी क्षीरसागर याने लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार नोंदविण्यात आली होती. आमच्या विषयीपुरोगामी विचारांची ‘झुंज न्यूज’ सडेतोड अग्रलेख परखड बातम्या अशी ओळख असलेले साप्ताहिक आम्ही डिजिटल स्वरूपात घेऊन येत आहोत.२७ वर्ष झुंज न्यूज ची वाटचाल अखंडित पणे चालू आहे याचा आम्हाला सार्थ आनंद तसेच अभिमान आहे. समाजातल्या तळा गाळा तल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे अविरत काम इथून पुढे ही अविरत पणे चालू राहील.दर्जेदार साहित्याने भरलेला दिवाळी अंक असो अथवा इतर विशेष अंकाची खासियत अशी झुंज न्यूज ची जनमानसात ओळख आहे हीच मेजवानी आता आम्ही डिजिटल स्वरूपात आणखी वाढवण्याचा प्रयत्न करू व थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने झुंज न्यूज चा वटवृक्ष उत्तरोत्तर बहरत जाईल यात आम्हाला कुठलीही शंका नाही.आपले प्रेम सदैव सोबत राहावे.




