सोमटणे फाटा येथील सुप्रसिद्ध पवना हॉस्पिटलचा २६ वा फाउंडेशन डे दिमाखात साजरा

मावळ मराठा न्यूज :- तळेगांव,मावळ परिसरातील रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या भूमिकेतून अहोरात्र गेले पंचवीस वर्ष कार्यरत असणाऱ्या पवन हॉस्पिटलच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त समारंभ आयोजित करण्यात आला.त्यानिमित्ताने हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाच्या विविध क्षेत्रात सर्वोत्तम सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डी एन बी या संस्थेकडून पदव्युत्तर शैक्षणिक कोर्सेसना मान्यता देण्यात आल्याचे प्रमाणपत्रही स्वीकारण्याचा समारंभही करण्यात आला. या समारंभाचे अध्यक्ष पद तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ डॉ.शाळीग्राम भंडारी यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ.बोकील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी होत्या.डॉ. सत्यजित वाढोवकर यांनी सर्वांचं स्वागत आणि हॉस्पिटल संदर्भात प्रास्ताविक केलं. त्यात त्यांनी सर्व रुग्णांचे आपल्या मातापित्यांचे आणि विशेष करून त्यांची पत्नी सौ डॉ. वर्षा या सर्वांविषयी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. डॉ.बोकील यांनी हॉस्पिटल साठी शुभेच्छा व्यक्त केल्या. पवना हॉस्पिटलच्या विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या कर्मचारी डॉक्टर, नर्सेस यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. समारंभाचे अध्यक्ष डॉ. शालिग्राम भंडारी यांनी वैद्यकीय क्षेत्रात गेले पंचवीस वर्ष सलग यशस्वीपणे रुग्णसेवा देणाऱ्या पवना हॉस्पिटलच्या सर्वांचं मनःपूर्वक मनापासून कौतुक केल. सोमटणे फाटा येथील एक छोट्याशा क्लिनिकचं रूपांतर जवळजवळ २०० बेडच्या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये रूपांतर होईपर्यंतच्या प्रवासाचा मी साक्षी आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. सत्यजित यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र रुग्णसेवेत मग्न असणाऱ्या डॉक्टर वर्षा यांनी आपल्या पवना हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचा आढावा आपल्या भाषणात घेतला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page