सुबोध तिवारी यांची मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि आयुष मंत्रालय वैज्ञानिक संशोधन समितीच्या अध्यक्षपदी निवड








मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळ्यातील जागतिक ख्याती असलेल्या कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांची मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि आयुष मंत्रालय वैज्ञानिक संशोधन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच, आरोग्य आणि कौटुंबिक क्षेत्रातील योग मंत्रालयाच्या उच्चस्तरीय सुकाणू गटाचे सदस्य म्हणून श्री सुबोध तिवारी (योग तज्ञ यांची 8 जून २०२६ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांचे प्रतिनिधित्व योगातील वैज्ञानिक पैलूला बळकटी देईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. श्री सुबोध तिवारी हे शंभरहून अधिक वर्षाचा वारसा लाभलेल्या जिथे विज्ञान आणि परंपरा यांचा संगम होतो अशा प्रतिष्ठित आणि जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेचे प्रतिनिधित्व करतात.योग प्रचार आणि प्रसारासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या पुढाकार आणि मार्गदर्शनाखाली कैवल्यधाम संस्थेत अनेक योगमय उपक्रम राबविले जात आहेत. देशाच्या कानाकोप-यात योगाचा संदेश पोहचवण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे योगक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.



