*इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘लायन्स सिंगिंग ऑयडाल्स’ राज्यस्तरीय गायक स्पर्धा उत्साहात संपन्न*

मावळ मराठा न्युज -पिंपरी (प्रदीप गांधलीकर )दिनांक : २४ मे २०२६ इंडियन म्युझिकल क्लब आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल आयोजित ‘लायन्स सिंगिंग ऑयडाल्स’ राज्यस्तरीय गायक स्पर्धा शनिवार, दिनांक २३ मे २०२६ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे अपूर्व उत्साहात संपन्न झाली. सुप्रसिद्ध पार्श्वगायक राजेश दातार, इंडियन म्युझिकल क्लबचे संस्थापक अनिल झोपे, राखी झोपे, पिंपरी – चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे रवी गोलार, सलीम शिकलगार, संदेश लाड, रवी सातपुते, बी. एल. जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम फेरीसाठी चार गटातील स्पर्धक गायकांनी वाद्यवृंदासोबत अतिशय दमदारपणे सादरीकरण उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली. सहा महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या निकषांवर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध भागांतून सुमारे १९५ गायकांनी सहभाग घेतला होता. दहा सदस्यीय संयोजक तसेच गायन क्षेत्रातील आठ विविध नामवंत आणि व्यावसायिक गायनतज्ज्ञांनी स्पर्धेचे परीक्षण करून अंतिम फेरीसाठी गायकांची निवड केली होती. स्पर्धेची विभागणी चार गटात करण्यात आली होती. पाच ते पंधरा वयोगट, सोळा ते चाळीस वयोगट, चाळीस ते पंचाहत्तर वयोगट आणि युगुलगायन करणारा गट अशा गटातून अंतिम विजेते घोषित करण्यात आले. पाच ते पंधरा वयोगट : -प्रथम क्रमांक – देवांश घाटे द्वितीय क्रमांक -प्रिन्सी गाठेतृतीय क्रमांक – रिद्धी गायकवाड सोळा ते चाळीस वयोगट : -प्रथम क्रमांक – शरण्या पेणगर द्वितीय क्रमांक -अस्मिता मुखर्जी तृतीय क्रमांक – आसावरी गुडदे चाळीस ते पंचाहत्तर वयोगट : -प्रथम क्रमांक – विशाल फडतरेद्वितीय क्रमांक -स्वाती केसकर तृतीय क्रमांक – संजय लागूयुगुलगायन करणारा गट : -प्रथम क्रमांक – विक्रम कुंटे आणि शुभांगी पांचाळ द्वितीय क्रमांक -आकाश जाधव आणि आदित्य काळेतृतीय क्रमांक – प्राची कर्णिक आणि जयरामन प्रत्येक गटातील विजेत्यांना अनुक्रमे रुपये एकवीस हजार (प्रथम), रुपये अकरा हजार (द्वितीय) आणि रुपये पाच हजार (तृतीय) रोख रक्कम व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. याशिवाय प्रत्येक गटातील उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी रुपये एक हजार रोख आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. राजेश दातार यांनी अंतिम फेरीचे परीक्षण करताना सर्व सहभागी स्पर्धकांना गायनाविषयी मौलिक सूचना दिल्या; तसेच हमीर रागावर आधारित ‘मधुबन में राधिका नाचे रे’ , ‘दर्दे दिल दर्दे जिगर’ ही गझल आणि ‘ना जा कही अब न जा’ हे शृंगारिक गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. इंडियन म्युझिकल क्लब अर्थातच आय एम सीच्या वतीने मान्यवर, हितचिंतक आणि परीक्षक यांचा सत्कार करण्यात आला.म्युझिक व्हिजनचे आशिष चौहान यांनी ध्वनिसंयोजन केले. चिंतन मोढा आणि अमन खान (की बोर्ड), हार्दिक रावळ (गिटार), असिफ खान (ऑक्टोपॅड आणि रिदम मशीन), हर्षद गनबोटे (तबला आणि ढोलक) यांनी साथसंगत केली. आय एम सीचे संजय वाघचौरे यांनी दृकश्राव्यचित्रण आणि छायाचित्रण केले. आय एम सीचे दीपक निस्ताने, धनश्री भोळे, विभावरी पाटील, निखिल वाणी आणि प्रशांत चौधरी यांनी संयोजन आणि रंगमंच व्यवस्थेची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. मिलिंद बावा यांनी खुसखुशीत शैलीतून कार्यक्रमाचे निवेदन केले. अनिल झोपे यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page