आंदर मावळ मधील भोयरे येथे आठवडे बाजाराचे उद्घाटन


मावळ मराठा न्युज मावळ,भोयरे येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरपंच वर्षा अमोल भोईरकर यांच्या प्रयत्नातून आठवडे बाजार आज दि. १० फेब्रुवारी पासून सुरु झाला आहे. दरम्यान भाजीपाल्यासह इतर वस्तूंसाठी स्थानिकांसह परिसरातील गावातील नागरिकांना पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करावी लागत होती, गावात आठवडे बाजार सुरू झाल्याने वेळ व प्रवासाचा खर्च वाचणार आहे. येथे बाजार सुरु झाल्याने विक्रेत्यांसह स्थानिकांनी स्वागत केले. सरपंच वर्षा भोईरकर यांनी एक वर्षांपूर्वी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गृहिणी स्थानिक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आपण गावातच आठवडे बाजार भरावा यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेतला होता. त्या अनुषंगाने परिसरातील आंबळे ते सावळा प्रथम गावांना लाऊड स्पीकरच्या माध्यमातून दर शनिवारी आठवडे बाजार भोयरे या ठिकाणी भरणार असल्याबाबत दवंडी देण्यात आली. त्यामुळे गाव व परिसरातील भाजीपाला उत्पादक किराणा भेळ भत्ता विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली होती प्रथमच गावात बाजार यशस्वीरित्या झाल्याने नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.दरम्यान आठवडे बाजाराचे उद्घाटन मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर, सरचिटणीस रोहिदास असवले, ज्येष्ठ नेते यदुनाथ चोरघे यांसह पंचक्रोशीतील सर्व गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.




