सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आयोजित स्पर्धेत लोणावळ्याचा रावी अजय ठाकूरने पटकवला ज्युनियर प्रिन्सेस ऑफ खापोलीचा मान

मावळ मराठा न्युज -खोपोली,सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या युथ नाईट,सौंदर्य सेलिब्रिटी स्पर्धेत ज्युनियर प्रिन्सेस ऑफ खोपोलीचा मान लोणावळ्याचा १० वर्षाची चिमुकली रावी अजय ठाकूरने पटकवला. या चिमुकली रावी ने मिळवलेला हा सन्मान म्हणजे लोणावळ्यासाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. या यशामुळे तिचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आयोजित खोपोलीत रंगली खोपोली युथ नाईट मध्ये सौंदर्य सेलिब्रिटी व मनोरंजनाची बहार या या कार्यक्रमात खोपोलीकर यांनी तुफान गर्दी केली होती. १ फेब्रुवारी २०२५ रोजी खोपोली, जनता विद्यालय येथिल सुंदर रोषणाई मधील युथ नाईट मध्ये सौंदर्य सेलिब्रिटी व संगीत,फैशन परिधान पोशाख करून सुंदर अश्या मनोरंजनाची बहार असलेली संध्या अगदी दिमाखदार पध्दतीने जल्लोषात पार पडली. या कार्यक्रमाचे आधारस्तंभ सुधाकर भाऊ घारे यांनी समाजाच्या सर्व स्तरावरचा सहभाग एकत्रित उभा करण्यासाठी अशा विविध संकल्पनेतून वेगवेगळ्या विषयांवर संघटित बळांवर कार्यक्रम राबविले पाहिजे व त्यासाठी सर्वांचं सहकार्य असावे असे प्रतिपादन केले.युथ वर्गाने शायनिंग स्टारच्या पोशाखात ज्युनियर प्रिन्स/ ज्युनियर प्रिन्सेस, प्रिन्स ऑफ खोपोली ,प्रिन्सेस ऑफ खोपोली, क्वीन ऑफ खोपोली अशा एक न अनेक स्पर्धेत सहभागीत कार्यक्रमाची सुंदर अशी रूप रेखा आखली होती. उत्साह , आनंदात आपल्यातील कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याचा आनंद यावेळेस युवकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. या स्पर्धेत मोठया संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेत विविध पारितोषिक सन्मानचिन्ह मिळवले.यावेळी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सिनेतारिका मराठी फेम अभिनेता अभिनय सावंत,फेम अभिनेत्री स्मिता गोंडकर तसेच अन्य कला सामाजिक ,राजकीय , क्षेत्रातील मान्यवरांनी युथ वर्गाचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी उपस्थिती दाखवली. या कार्यक्रमाला सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनचे निलेश औटी, स्वेला तुषार अहिर, दर्शन अहिर, नारायणी अमोल केदारी,नवीन देशमुख,वकर राजपूत,निखिल ढोले,रवी घारे, अंकित मोरे,कोरिओग्राफर जयेश पाटील,क्रीएशन डान्स स्टुडिओ फौंडर हेमंत लोटे आदी व्यवस्थापक मंडळाने व तरुण पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यशस्वी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page