लोणावळा औ.वसाहतीचे माजी अध्यक्ष मनोहर आठल्ये यांचे निधन

मावळ मराठा न्युज – लोणावळा, दि ८ जुलै२०२६,लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहतीचे माजी अध्यक्ष व एन एक्स टेक्नॉलॉजी कंपनीचे मुख्य संचालक मनोहर रामकृष्ण आठल्ये, वय ८० यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. इंजिनीरिंग नंतर कोकणातून लोणावळ्यात येऊन १९७० साली त्यांनी लोणावळा औद्योगिक वसाहती मध्ये स्वतःचा फॅब्रिकेशन चा व्यवसाय सुरु केला आणि यशस्वी केला आणि रोजगार निर्मिती केली. लोणावळा औद्योगिक वसाहतीचे ते १० वर्षां पेक्षा जास्त काळ अध्यक्ष होते. लोणावळा बाजार सहकारी संस्थेच्या स्थापनेत संस्थापक मुकुंद शहा यांचेसह त्यांनी मोठे योगदान दिले. लोणावळा बाजारचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले. अखेर पर्यत लोणावळा बाजारचे संचालक म्हणून कार्यरत ते होते. भांगरवाडीतील सूर्य नमस्कार मंडळातही ते ४० वर्ष कार्यरत होते. त्यांचे पश्चात पत्नी रजनी, दोन मुले, सून नातवंडे असा परिवार आहे.सिग्मा मॅन्युफॅक्चरिंग कार्पोरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आशुतोष आठल्ये व व व्यावसायिक अभिजीत आठल्ये हे त्यांचे पुत्र होत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page