पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका,प्रा.सुरेखा कटारिया यांना प्रदान

मावळ मराठा न्युज -सायन्स पार्क सभागृह, चिंचवड – नुकतेच कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त साहित्य क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्यां प्राध्यापिका सुरेखा कटारिया यांना नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया यांना नारायण सुर्वे जीवन गौरव सन्मान प्रदान केला. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर अध्यक्षस्थानी होते. नारायण सुर्वे अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, स्वानंद महिला संस्थेच्या अध्यक्षा शोभा बंब, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त कवी सिताराम नरके आदी उपस्थिती होते. उद्योजक आणि कृषिभूषण सुदाम भोरे यांच्या सहधर्मचारिणी वर्षा भोरे (मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान),रोहित खरगे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस ), ज्येष्ठ साहित्यिका पल्लवी बनसोडे परुळेकर (नारायण सुर्वे विचार साधना), कवी राजू जाधव (नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे जैन भवनचे अध्यक्ष मा. डॉ. अशोक कुमार पगारिया,जैन विद्या प्रसारक मंडळाचे सहाय्यक सेक्रेटरी मा. अनिल कुमार कांकरिया, ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या प्रमुख मार्गदर्शक मा. लता पगारिया, मा प्राचार्य सुभाष बेदमुथा, मा अनिल कुंभार व शांताराम बेळगावकर , आकुर्डी संघाचे मा. विजय गांधी माजी अध्यक्ष सुभाष ललवाणी, आकुर्डी संघाचे विश्वस्त मा. सूर्यकांत मुथीयान, मा. जवाहर मुथा, मा. नेनसुख मांडोत, प्राधिकरण संघाचे अध्यक्ष मा. राजेंद्र मुनोत, भोसरी श्री संघाचे अध्यक्ष मा. राजेंद्र बांठिया, माजी अध्यक्ष राजेंद्र चोरडिया, दापोडी श्री संघाचे अध्यक्ष दिलीप भन्साळी, पिंपळे गुरव संघाचे अध्यक्ष राजेंद्र कर्नावट, माजी अध्यक्ष प्रा. सुरेश धाडीवाल, खडकी संघाचे अध्यक्ष मा. विलास मुथा, चिंचवड स्टेशनचे उपाध्यक्ष मा. डॉ. अशोक बोरा, कासारवाडी संघाचे अध्यक्ष विलास पगारिया, स्वानंद महिला संस्थेच्या माजी अध्यक्ष अनुक्रमे छाया मंडलेचा, मा. सुनिता बोरा, लीना कटारिया, सविता बांठिया, मनिषा चोरडिया, सुनिता लूनावत, नंदा लुंकड, शुभांगी कात्रेला, सुप्रिया सोलंकुरे, शकुंतला ओसवाल , सौ. बाविस्कर तसेच स्वानंद च्या अनेक सदस्या उपस्थित होत्या. स्वानंद महिला संस्थेच्या वतीने होणाऱ्या अखिल भारतीय 16 व्या श्री साहित्य संमेलनाच्या लोगोचे प्रकाशन मा. डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे नियोजन,जेष्ठ समाजसेवक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले.लोगो संदर्भात कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड यांनी माहिती दिली.कार्यक्रमाचे निवेदन प्रा. दिगंबर ढोकळे यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page