*रोटरी क्लब ऑफ तळेगाव गोल्डन* व सर्व होस्ट क्लब व को होस्ट क्लब्स तर्फे NDRF सुदुंबरे येथे *”भव्य वृक्षारोपण अभियान 1111 चे आयोजन*








मावळ मराठा न्यूज – मावळ,रोटरी क्लब तर्फे 1111 वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम**तळेगाव दाभाडे, पुणे | 29 जुलै 2026* “Create Lasting Impact” या रोटरीच्या ध्येयानुसार आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 एन्व्हायरमेंट टीमच्या संयुक्त विद्यमाने *रोटरी क्लब ऑफ तळेगाव गोल्डन* व सर्व होस्ट क्लब व को होस्ट क्लब्स तर्फे बुधवार, दि. 29 जुलै 2026 रोजी सकाळी 9:00 वाजता NDRF सुदुंबरे, ता. मावळ, पुणे येथे *”भव्य वृक्षारोपण अभियान 1111″* चे आयोजन करण्यात आले आहे.या अभियानांतर्गत NDRF सुदुंबरे येथे 1111 वृक्षांचे रोपण व संगोपन केले जाणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि हरित महाराष्ट्राच्या दिशेने टाकले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.#### *प्रमुख उपस्थिती:*1. *श्रीमान. एस.बी.सिंह* – कमांडंट, 5th NDRF2. *DG नितीन उमाळे* – डिस्ट्रिक्ट 31313. *रो. संतोष दाभाडे* – नगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगरपरिषद#### *आयोजन समिती:**रो. सुबोध मालपाणी* – डायरेक्टर एन्व्हायरमेंट, *रो. सदाशिव काळे* – को-डायरेक्टर एन्व्हायरमेंट, *रो. किरण ओसवाल* – को-चेअरमन डिस्ट्रिक्ट एन्व्हायरमेंट टीम 3131 व समन्वयक वृक्षारोपण अभियान#### *होस्ट क्लब:*रोटरी क्लब ऑफ लोणावळा, पुणे बाणेर, प्राधिकरण पुणे, पिंपरी टाऊन, निगडी, डायनॅमिक भोसरी, खडकी#### *को-होस्ट क्लब:*रोटरी क्लब ऑफ बेलमोंडो, पुणे ईस्ट, पिंपळे सौदागर सेंट्रल, पिंपरी एलिट तसेच ग्रेस फाउंडेशन पुणेरोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे *अध्यक्ष रो. प्रशांत ताये, उपाध्यक्ष/प्रकल्प प्रमुख रो. प्रदीप टेकवडे, सचिव रो. बसप्पा भंडारी, सह प्रकल्प प्रमुख रो. राजु शिंदे आणि IPP रो. संतोष परदेशी* यांनी सर्व नागरिकांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.या उपक्रमाद्वारे पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होऊन पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि हिरवेगार वातावरण निर्माण होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.



