*’कलापिनीचे स्वप्न आपण सर्वांनी पूर्ण करायचे’; रवींद्र धारणे*

मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे,”गुरुतुल्य व्यक्तिमत्व असलेले डॉ अनंत परांजपे ह्यांनी पाहिलेले कलापिनी हे स्वप्न आपण सर्वांनी पूर्ण करायचे आहे, हा जगन्नाथचा रथ आपल्याला पुढे न्यायचा आहे”, अशा भावना, गुरुवंदना ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या प्रसिद्ध उद्योजक श्री रवींद्र यशोधर धारणे ह्यांनी व्यक्त केल्या.कै. पुष्पलता अरोरा ह्यांच्या स्मृतीनिमित्त गुरुवंदना हा कार्यक्रम कलापिनीत दरवर्षी आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते. कै. पुष्पलता अरोरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कलापिनीत दरवर्षी आयोजित केला जाणारा ‘गुरुवंदना’ कार्यक्रम यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध सांस्कृतिक सादरीकरणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नव्या उपक्रमांच्या घोषणेमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन झाल्यानंतर कलापिनी कुमार भवनच्या मुलांनी गाणी सादर केली. त्यानंतर ज्योती गोखले आणि केतकी लिमये ह्यांचे एकपात्री सादरीकरण झाले. कार्यक्रमात ह्यानंतर एसएससी, एचएससी, ग्रॅज्युएशन आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला गेला. त्यासाठी प्रतीक विनोद मेहता यांनी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ पारितोषिक दिली . कलापिनीमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या संस्कृत पठण वर्ग याचे मार्गदर्शक माधव आपटे आणि अस्तोदय या पुस्तकाचे लेखक संजय साखळे यांचे सत्कार केले गेले. डॉ. अनंत परांजपे ह्यांनी कलापिनीतील पाच रंगमंचाचा लाभ सर्व कलाकारांनी घ्यावा आणि कलापिनीचे कार्य पुढे न्यावे असे आवाहन करून कलापिनीच्या उपक्रमांमध्ये सर्वांचा सहयोग असावा ही आशा व्यक्त केली. कलापिनी ह्या वर्षी नवे दोन अंकी नाटक बसवीत आहे. त्याचाच मुहूर्त म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी ‘बेईमान’ या वसंत कानेटकर लिखित नाटकाचे नाट्य वाचन कलापिनी युवा मंचने सादर केले. कार्यक्रमाला कार्याध्यक्ष अंजलीताई सहस्रबुद्धे आणि कार्यकारणी सदस्य डॉ.विनया केसकर, लीना परगी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष अशोक बकरे, सूत्रसंचालन राखी भालेराव ह्यांनी केले तर आभार विनायक भालेराव यांनी मानले. बालभवन प्रमुख मधुवंती रानडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशिक्षीकांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन नियोजन केले. त्याचप्रमाणे महिला मंच आणि कलापिनीच्या सर्व कार्यकर्त्यांचा देखील सहयोग लाभला. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग कार्यक्रमास उपस्थित होता

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page