कोथरूड पोलीस स्थानक येथे झाशीच्या राणींच्या जयंतीनिमित्त महिला पोलिसांचा सन्मान



मावळ मराठा न्युज :-कोथरूड,झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त १९ नोव्हेंबर रोजी राष्ट्राय स्वाहा संघटनेच्यावतीने कोथरूड पोलीस स्थानक येथे महिला पोलिसांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात मा. श्री. अनिलजी व्यास (भाग संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांच्या हस्ते महिलांना सन्मानपत्र आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.या प्रसंगी अश्विनी कुलकर्णी (भागप्रमुख, राष्ट्राय स्वाहा) आणि संस्थापक विश्वस्त विशाल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.महिला पोलिसांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढताना, “गणपती, नवरात्रोत्सव आणि निवडणुकांच्या बंदोबस्तासह राष्ट्रसेवेसाठी अहोरात्र दक्ष राहणाऱ्या महिला पोलिस आजच्या काळातील झाशीच्या राणी आहेत,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाचा समारोप “राष्ट्र प्रथम, वंदे मातरम्” या घोषणांनी करण्यात आला.




