जेष्ठ नागरिक संघ,लोणावळा यांच्या वतीने विरंगुळा केंद्रात जुलै महिन्यातील वाढदिवस असणाऱ्या ३४ सभासदांचा वाढदिवस साजरा









मावळ मराठा न्युज – लोणावळा,विरंगुळात जुलै महिन्यात ज्यांचे वाढदिवस होते. त्यां ३४ सभासदांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेत .त्या कार्यक्रमाची रुपरेखा जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा श्रीमती मृदुला ताई पाटील , उपाध्यक्ष श्री. रवीन्दजी कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री. सत्यनारायण अग्रवाल, खजिनदार श्रीमती संध्याताई गव्हले, सहखजिनदार भगवती प्रसाद अग्रवाल, सेक्रेटरी सौ. प्रतीक्षा महाडिक, सहसेक्रेटरी सौ. शारदा अग्रवाल आणि सर्व कार्यकारिणी च्या अध्यक्षतेखाली पार पाडलं गेलं . सेलिब्रिटी सभासदांच्या हातून दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. सर्वांनी आपआपल्या पसंतीची गाणी म्हणंटलीत . बाबुजी वाळुंज यांनी सुध्दा आपल्या वाढदिवसा निमित्त सर्व सभासदांना विठोबांची फ्रेम दिली. सर्व सेलिब्रिटी सभासदांना संघातर्फै गिफ्ट देण्यात आले. नंतर पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . त्यानंतर सर्वांना चहा आणि अल्पोपहार देण्यात आले.



