एआयसीटीच्या वतीने डिझायनिंग विषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन

मावळ मराठा न्युज :-चिंचवड येथील- एआयसीटी च्या वतीने डिझाईन इन्स्टिट्यूट, इंटिरिअर डिझायनिंगमध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रमाची रचना केली आहे. सर्व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इंटिरिअर डिझाईन म्हणजे काय याची माहिती देण्यासाठी ५ दिवसीय मोफत इंटिरिअर डिझाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी इंटिरियर डिझायनरचे भविष्य काय आहे. करिअर कसे करावे याविषयी तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळा २४ ते २८ जून १०:३० ते १२:३० या वेळेत होणार आहे. कार्यशाळेचे ठिकाण 3रा मजला बहिरवडे प्लाझा, जनता बँकेच्या वर, निरामय हॉस्पिटल रोड, चिंचवड, पुणे हे असेल. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून प्रमाणपत्र देण्यात येईल. अनुभवी प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील आणि इंटिरिअर डिझायनिंग निवडण्याचे महत्त्व, व्याप्ती तसेच बाजारपेठेतील करिअर पर्याय आणि संधी याविषयी सांगतील.संस्था सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेवर ५०% पर्यंत प्रखर शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मुलींना शिक्षण शुल्कात १०% अतिरिक्त सवलत दिली जाते.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना इंटेरिअर डिझाईन अभ्यासक्रम आणि आजच्या स्पर्धात्मक जगात इंटिरियर डिझायनरची व्याप्ती यावर चर्चा केली जाईल. अधिक माहितीसाठी ८६६९६६१४५१ या क्रमांकवर संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page