विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘यार बिना चैन कहा रे..’सुमधुर गीतांच्या सुरेल वर्षावात श्रोते चिंब

मावळ मराठा न्यूज -पिंपरी,(प्रदीप गांधलीकर)
दिनांक २३ जून २०२५ विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘यार बिना चैन कहा रे…’ या सुमधुर हिंदी – मराठी गीतांच्या ऑडिओ – व्हिज्युअल नि:शुल्क सांगीतिक मैफलीतील सुरेल वर्षावात श्रोते चिंब झाले. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात (छोटे सभागृह) रविवार, दिनांक २२ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत दिशा सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सचिन साठे, सेवानिवृत्त नौदल अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, साहित्यिक प्रदीप गांधलीकर, जी. बी. कुलकर्णी, नूतन कुलकर्णी, प्रशांत वैद्य, मोहन भस्मे, विजय सहारे, कांतीलाल जानराव यांची प्रमुख उपस्थिती होती. गणेशस्तवनानंतर ‘माउली माउली रूप तुझे…’ या भक्तिरचनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

विनायक कदम यांनी संयोजन केले; कार्यक्रमाची संकल्पना नंदकुमार कांबळे यांची होती.
सचिन शेटे यांनी विशेष साहाय्य केले. साहिल आणि सानिका कांबळे यांनी संयोजनात सहकार्य केले. शैलेश घावटे यांनी ध्वनिसंयोजन केले. सौमिल घावटे यांनी दृकश्राव्यचित्रण केले. सुहास चांगण यांनी छायाचित्रण केले. आकाश गाजूल यांनी फोटोग्राफी केले. दृश्यनिर्मिती विक्रम क्रिएशनच्या साहाय्याने करण्यात आली. घनश्याम आगरवाल यांनी अभ्यासपूर्ण आणि खुसखुशीत शैलीतून निवेदन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page