पीएला काढा,नाहीतर मंत्रिपद काढणार,अशी समज मोदींनी राणेंना दिल्याचा विनायक राउत यांचा दावा

मावळ मराठा न्यूज:- (प्रतिनिधी)शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना समज दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केलाय. नारायण राणे यांच्या पीएने अनेकांना गंडा घातलाय, असा दावा विनायक राऊतांनी केलाय. नारायण राणे लोकसभेची पायरी विसरले आहेत. पीएला काढा, नाहीतर मंत्रिपद घेणार, अशी समज मोदींनी राणेंना दिल्याचा गौप्यस्फोट विनायक राऊतांनी केलाय.“नारायण राणे लोकसभेची पायरी चढायला विसरले आहेत. ते अधिवेशनात प्रश्नोत्तरांच्या तासालाही उपस्थित राहत नाहीत”, असं विनायक राऊत म्हणालेनारायण राणे आणि ठाकरे गट यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. नारायण राणे यांनी अनेकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केलीय. तसेच दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणे यांनी थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि नारायण राणे यांच्यात नेहमी शाब्दिक चकमक घडत असते.“नारायण राणेंनी एक पीए ठेवला होता. पीएची कामं पटवापटवीची. अनेकांना पटवून गंडा घातला. मोदींच्या ते लक्षात आलं आणि वॉर्निंग दिली की, पहिले त्याला हाकलून दे, नाहीतर मंत्रीपद काढून घेणार”, असा दावा विनायक राऊतांनी केला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page