लोणावळा नगरपरिषदेचा महत्वाकांक्षी १२ कोटींचा भुयारी गटार योजनेच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी

मावळ मराठा न्यूज, लोणावळा:- लोणावळा नगरपालिकेने १२ कोटी रुपये खर्च करून भुयारी गटार योजनेचे काम चालू केले असून सदर काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे मुख्य बाजारपेठ, गावठाण, सिद्धार्थनगर,वर्धमान सोसायटी,निसर्ग नगरी, कैलास नगर,हनुमान टेकडी संपूर्ण भांगरवाडी परिसर इत्यादी प्रभागातून सर्व गटारीतले पाणी

भुयारी गटारा मधुन डोंगरगाव येथे एसटीपी प्लॅन जाणार आहे तिथे गेल्यावर खराब पाण्यावर प्रक्रिया करून सदर पाणी गार्डन व बांधकाम क्षेत्रात वापरण्यात येणार आहे त्यामुळे ह्या भुयारी गटारामुळे यावर्षीपासून इंद्रायणी नदीमध्ये गटाराचे खराब पाणी जाणार नाही माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव ,उपनगरध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या कार्यकाळात कामाला सुरुवात झाली आणि सदर काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. भुयारी गटार योजनेचे काम लवकरच पूर्ण होईल. हे पूर्ण झाल्यानंतर मावळ वासियांची आणि वारकरी संप्रदायाची श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी जीचे उगमस्थान हे लोणावळा शहर आहे. त्यात अनेक वर्षे गटारीचे सांडपाणी जात असल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरत असल्याने आणि काही श्री गणेश मंडळ त्यातच बाप्पाचे विसर्जन करत असल्याने उत्सवाचे पावित्र्य देखील भंग होत होते.परंतु आता भुयारी गटारीचे काम पूर्ण झाल्यावर तो प्रकार थांबणार आहे.सदर कामाची पाहणी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी पंडित पाटील, उपमुख्य अधिकारी डॉ.भगवान खाडे माजी नगरसेवक राजु शर्मा,माजी नगरसेवक ललित सिसोदिया, आशिष बुटाला,पाणीपुरवठा अभियंता यशवंत मुंडे ठेकेदार नलावडे यांच्या समवेत पाहणी करून बाजारपेठ मधील स्थानिक नागरिकांना जायला यायला त्रास होत आहे त्यासाठी संबंधित ठेकेदाराला लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page