काळिमा फासणारी घटना,लोणावळ्यात एका तरुणीवर तिघांचा सामूहिक बलात्कार,एकाला अटक,दोघांचा शोध सुरु






मावळ मराठा न्युज – लोणावळा लोणावळ्यात निर्जन रस्त्यावर तीन तरूणांनी एका तरूणीला कारमध्ये खेचुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या १२ तासात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला तात्काळ अटक केली आहे. लोणावळ्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. पोलीस यांचे कडून दोन जणांचा शोध घेतला जात आहे. लोणावळ्यातील या घटनेनंतर मावळात एकच खळबळ उडाली आहे. नांगरगाव येथील दत्त मंदिर दत्त सोसायटी शेजारील एका निर्जन रस्त्यावर एक तरुणी संशयास्पद रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. याबाबत लोणावळा शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांनी या तरुणीला शेजारी असलेल्या एका मंदिरात ठेवले होते. अतिशय घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या तरूणीवर प्रथम वैद्यकीय तपासणी केली. पोलिसांनी तरूणीचा जबाब नोंदवला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.या गुन्ह्याबद्दल लोणावळा शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.




