मावळ वार्ता फौंडेशनचे रोप्य महोत्सवी वर्ष;दहीहंडी उत्सव बक्षीस ५० ऐवजी ७५ हजार,तरुणाईला देणार नशा मुक्तीचा संदेश







मावळ मराठा न्युज- लोणावळा,मावळवार्ता फाऊंडेशन लोणावळा यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. गेली २५ वर्ष मावळवार्ता फाऊंडेशन लोणावळा शहरात अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबवित आहे.लोणावळ्यातील अतिवृष्टीमुळे लोणावळ्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे लोकांचे संसार उध्वस्त झाले. ‘आम्ही लोणावळेकरः मदत नव्हे कर्तव्य’ या भावनेतून १००० कुटुंबांना २३ जीवनावश्यक वस्तु व जिन्नसांच्या किटचे वाटप केले.
तसेच या वर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस सत्यनारायण मंदिर कमिटी यांच्या सहकार्याने सर्व शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना १ लाख वह्यांचे वाटप करण्यात आले. गेली २५ वर्ष लोणावळ्यातील सर्व राजकीय पक्ष, लोणावळा शहर पत्रकार संघ,स्वामी समर्थ प्रमोटर्स अॅन्ड डेव्हलपर्स, स्पेसलिंक केबल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने दहिहंडी लोकोत्सवाचे आयोजन करीत असते.या वर्षीच्या दहीहंडी उत्सव नियोजनसंदर्भात येथील हाटेल मुंबई मसाला. येथे नुकतीच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. याच वर्षी फक्त दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकना दरवर्षी दिले जाणारे बक्षीस ५० हजार ऐवजी ७५ हजार दिले जाईल असे आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी किरण गायकवाड,ज्ञानेश्वर येवले,नवीन भुरट नासिरभाई शेख,संजय अडसूळे,बाळासाहेब पाठक,मंगेश अग्रवाल,संदीप वर्तक,भरत तिखे,आशिष बुटाला,हेमंत मुळे बापू तारे,जितेंद्र कल्याणजी,बाबू भाई शेख,आणि गिरीश पारेख मनीषा भंबोरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.



