शिक्षक दिनी वाळंज विद्यालयात विद्यार्थ्यांनी भरवली शाळा




मावळ मराठा न्यूज़, अम्बवने, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिनी ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे निमित्त विद्यार्थ्यांनी आज पूर्ण वेळ मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी भूमिका घेऊन शाळा भरवली.. परिपाठ, विषयानुसार तासिका नियोजन, स्वच्छतेची कामे, शालेय घंटा वेळा असे सर्व उत्तम नियोजन केले. शिक्षकांचा यथोचित सन्मान केला.तसेच अंबवण्यातील पदाधिकारी उल्हास मानकर उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, गणेश वाळंज अध्यक्ष तंटा मुक्त, गणेश दळवी पोलीस पाटील, योगेश वाळंज अध्यक्ष शिक्षक पालक संघ, विनायक तोंडे मा.अध्यक्ष जि. प. शाळा व्यवस्थापन समिती इ. मान्यवर ग्रामस्थांनी सोनू अनाजी वाळंज विद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन सर्व शिक्षक, कर्मचारी यांचा सन्मान केला. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार वाळंज व मा. आदर्श सरपंच वत्सलाताई वाळंज यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी कुलथे म्हणाले की, आपल्या माणसानी शैक्षणिक कार्या ची दखल घेतली. आम्हाला सन्मानीत केले त्याबदल आभार व्यक्त केले.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




