साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे लांडेवाडी भोसरी येथील उद्यान विकसित करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास निदर्शने करणार -शिवाजीराव खडसे

मावळ मराठा न्युज -पिंपरी,प्रतिनिधी, दिनांक २४ – २ -२०२४ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यान भोसरी लांडेवाडी चोरीला गेल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची विनंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त जांभळे पाटील साहेब व उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त ढाकणे साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. परंतु अद्याप कोणत्याच प्रकारचे ठोस कृती आणि कारवाई करण्यात आलेली नाही त्या संदर्भात आज शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे व संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त ढाकणे साहेब यांना येत्या आठ दिवसाच्या आत मध्ये सकारात्मक निर्णय न घेतल्या निदर्शने करण्याचा इशारा शिवशाही व्यापारी संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे व खेड तालुका अध्यक्षा उषाताई कांबळे यांनी लेखी समक्ष भेटून इशारा दिला आहे .या संदर्भात होणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची राहील असा इशारा शिवाजीराव खडसे व उषाताई कांबळे यांनी दिला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page