वसंत व्याख्यानमाला-मला भेटलेली माणसे’ या विषयावर डॉ नितीन आरेकर यांनी तिसरे पुष्प गुंफले

मावळ मराठा न्युज -लोणावळा, दि २४; वसंत व्याख्यानमाला समिती लोणावळा आयोजित व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प ‘ शब्दांकनकार डॉ नितीन आरेकर यांनी गुंफले. मला भेटलेली माणसे’ या विषयावर त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. व्याख्यानातून त्यांनी मोठी माणसे मोठी ,कशी होतात? हे त्यांच्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या मोठमोठ्या व्यक्तींच्या वागणुकींचे दाखले देत श्रोत्यांसमोर स्पष्ट केले. व्याख्यानाची सुरुवात त्यांनी त्यांची आणि भीमसेन जोशींची एका पावसाळी रात्री झालेल्या भेटीचा किस्सा सांगत केली. त्यांना भेटलेली प्रत्येक व्यक्तिमत्वे की लता मंगेशकर ,पु. ल. देशपांडे, अमिताभ बच्चन ,जॉनी लिव्हर ,नितीन देसाई, परविन सुलताना, डाॅ.अमोल कोल्हे यांच्या आठवणींची एक एक पाकळी अलगद उमलवत त्यांच्यातील मोठेपणाची जाणीव पुन्हा पुन्हा रसिक श्रोत्यांना करून दिली. हे किस्से फक्त सिनेसृष्टीतील कलाकारांचेच नाही तर राजकारण , कला क्रिडा अशा इतर क्षेत्रातील व्यक्तींचे देखील होते. ज्यामध्ये शरद पवार, रमेश तेंडुलकर ,उस्ताद झाकीर हुसेन अशा अनेक दिग्गजांची मांदियाळीच होती. या सोन्यासारख्या व्यक्ती स्वतः झळकत असताना त्यांच्या सानिध्यात असणाऱ्या इतरांचे आयुष्य देखील उजळवून टाकतात. सूत्रसंचालन व्याख्यानमाला समिती विश्वस्त मंडळ उपाध्यक्ष प्रशांत पुराणिक यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले. यावेळी. विश्वस्त मंडळ अध्यक्षा राधिका भोंडे, कार्यकारिणी अध्यक्षा,स्वरुपा देशपांडे, उपाध्यक्ष नितीन तिकोने, विश्वस्त मंडळ सदस्य रविंद्र कुलकर्णी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page