लोणावळा फक्त निसर्ग संपन्न नाही,तर तंत्रज्ञान,पर्यटन,संस्कृतीचा मिलाफ असलेले आधुनिक शहर बनवणार-अ‍ॅड.सुरज देसाई

मावळ मराठा न्युज -लोणावळा -शांत,सुंदर आणि पर्यटनासाठी ओळखले जाणारे लोणावळा आता नव्या युगात प्रवेश करण्यास सज्ज आहे. शहराला आधुनिक, स्मार्ट आणि नागरिक-केंद्रित बनविण्याचा निर्धार करत तरुण कायदेतज्ञ् अ‍ॅड. सुरज गौतमभाऊ देसाई यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. आता पर्यंत लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा आणि कल्पना यांचा नुसार लोणावळा शहराचा विकास केला,परंतु आता लोणावळ्याला लोकांभिमुख विकासाकडे म्हणजे सत्तेत सुद्धा लोकांचा सहभाग घेऊन शहरासाठी असलेल्याला चांगल्या आधुनिक कल्पना,पारदर्शकता,या आधारे शहराचा विकास करण्याचा मानस तरुण,तडफदार आणि आपल्याशहरासाठी काहीतरी चांगलं करण्याची जिद्ध असलेला नगराध्यक्षपदासाठी तरुण कायदेतज्ञ् असा सुशिक्षित उमेदवार म्हणूंन पुढे येत आहे ही लोणावळा शहरासाठी नक्कीच आशादायी बाब आहे. लोणावळा नगरपालिका काही वर्षांपूर्वी भ्रष्ट्राचार घोटाळा यासाठी बरखास्त झाली होती. तो कलंक पुसण्यासाठी मला लोकांचा सहभाग,पारदर्शकता आणि ग्रामसभा सारखं आधी जनतेत ठराव मांडून गावाच्या हिताचे काय ते ठरवून निर्णय घेण्याचा मानस देसाई यांनी मावळ नागरिक शी बोलताना व्यक्त केला आहे. आणि त्यांचा ह्या दूरदृष्टीला लोणावळेकर नागरिक नक्कीच साथ देतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.“लोणावळा फक्त निसर्गसंपन्न नाही,तर तंत्रज्ञान, पर्यटन आणि संस्कृती यांचा मिलाफ असलेले आधुनिक शहर बनण्याची क्षमता ठेवते. मला त्या परिवर्तनाची जबाबदारी घ्यायची आहे,” असे अ‍ॅड. देसाई यांनी सांगितले.कायद्याच्या क्षेत्रात दहा वर्षांचा अनुभव आणि समाजसेवेचा ठसा असलेले अ‍ॅड. देसाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक स्पष्ट दृष्टी मांडतात.स्वच्छ रस्ते, सुरक्षित परिसर, सुसज्ज पर्यटन सुविधा, महिलांसाठी संधी आणि युवकांसाठी रोजगार,हे त्यांचे मुख्य प्राधान्य.ते म्हणाले,“प्रत्येक नागरिकाला डिजिटल सेवा, पारदर्शक प्रशासन आणि सुरक्षित जीवनमान मिळाले पाहिजे. शहरातील प्रत्येक निर्णय हा नागरिकांच्या हितासाठी आणि त्यांच्या सहभागातून घ्यायचा आहे.‘स्मार्ट लोणावळा’ हे केवळ नाव नाही,तर नागरिकांचा अधिकार आहे.”अ‍ॅड. देसाई यांच्या मते, पर्यटन व रोजगार निर्मिती, कचरा व्यवस्थापन, डिजिटल गव्हर्नन्स आणि महिला सक्षमीकरण या चार स्तंभांवर लोणावळ्याचा भविष्यकाळ उभा राहणार आहे. ते शहरातील युवक,व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून सामूहिक विकासाचे नवे मॉडेल तयार करू इच्छितात.“लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ, स्मार्ट आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखले जावे-हा माझा वैयक्तिक संकल्प आहे,”असे अ‍ॅड. सुरज देसाई यांनी सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page