शिवजयंती निमित्ताने आज पिंपळे सौदागर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन


मावळ मराठा न्यूज ;-पिंपरी(प्रतिनिधी) डॉ अगरवाल आय हॉस्पिटल हा नेत्र रुग्णालयातील भारतातील सुप्रसिद्ध ब्रँड आहे. पिंपरी चिंचवड मधील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ् डॉ बबन डोळस यांच्या बरोबर नुकतेच डॉ अगरवाल आय हॉस्पिटल ची नवीन शाखा सुरु झाली आहे.शिवजयंती चे औचित्य साधून येत्या १९ फेब्रुवारी पासून पिंपळे सौदागर येथील रुग्णालयात मार्च अखेरपर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती डॉ बबन डोळस यांनी दिली आहे. डॉ बबन डोळस हे गेली २५ वर्षे पिंपरी चिंचवड येथे नेत्र सेवा देत आहेत. ग्लोबल संस्थेमार्फत २००८ साली शहरातील प्रथम नेत्र पेढी देखील त्यांनी सुरु केली आहे.पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना माफक आणि दर्जेदार अत्याधुनिक नेत्र सेवा देता यावी यासाठी डॉ अगरवाल नेत्र रुग्णालयाशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती नेत्रतज्ञ डॉ बबन डोळस यांनी सांगितले.मोफत नेत्र तपासणी साठी ८८००६६८४५५ या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.




