सुरेखा जाधव यांनी दिल्या देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रचे मुख्यमंत्री व्हावे म्हणून शुभेच्छा



मावळ मराठा न्युज -लोणावळा महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीने घवघवीत यश संपादित केले. त्याबद्दल देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथील सागर बंगल्यावर भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.यावेळी लोणावळ्याच्या कार्यक्षम माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,आणि भाजप चे आशिष बुटाला यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रचे मुख्यमंत्री व्हावे म्हणून शुभेच्छा दिल्या व सदिच्छा भेट घेतली. तसेच महाराष्टाचे वन मंत्री सुधीर मुंगट्टीवार यांचे देखील विजयी झाल्याबद्दल अभिनंदन केले.




