मुंबई पुणे महामार्गवरील कुमार चौक लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अतिक्रमण असलेली वाहतूक नियंत्रण आणि नियमन पोलीस चौकी नगरपरिषदेने हटवली







मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण विरोधी कारवाई ने वेग घेतला आहे. आजच्या कारवाईत लोणावळा शहर पोलीस स्टेशनची कुमार चौकातील अतिक्रमण असलेली वाहतूक पोलीस चौकी काढण्यात आली. मुंबई पुणे हायवे वरील संपूर्ण वाहतूक कोंडी,वाहतूक नियमन,दंड वसुली याच चौकीतून केले जात होते. परंतु आता लोणावळा शहर पोलीस हद्दीतील ही वाहतूक नियंत्रण पोलीस चौकीच हटवल्याने वाहतूक नियंत्रण आणि नियमन करायला मोठी अडचण होणार आहे. मुंबई पुणे हायवे वरील ही महत्वाची पोलीस चौकी अतिक्रमणग्रस्त झाल्याने शहर पोलीस स्टेशन ला ती काढून घेण्याबाबत कळवण्यात आले होते त्यानुसार त्या चौकीतील साहित्य,फर्निचर काढण्यात आले होते. वाहतुकीला अडचण ठरणारी पोलीस चौकी आज जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. त्यामुळे यापुढे एवढ्या महत्वाच्या आणि रहदारीच्या पोलीस चौकीला लोणावळा नगरपरिषद अधिकृत नवीन जागा देईल का? पोलीस चौकी कुठे? कधी? उभारली जाईल? तोपर्यंत वाहतूक नियंत्रण आणि नियमन कसं होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अतिक्रमण कारवाईत पोलीस चौकी सुद्धा सुटली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये एक चांगला संदेश जाईल. लोणावळा शहर पोलिस यांनी देखील स्वतःहून सदर पोलीस चौकी काढण्यास सहकार्य केले आणि नगरपरिषदेने आम्ही पोलीस चौकी काढू शकतो तर बाकी अतिक्रमण करणाऱ्या लोकांमध्ये एक चांगला संदेश जाईल.



