आई एकवीरादेवी मंदिरात उत्साहात घटस्थापनाकार्ला गडावर हजारो भाविकांनी घेतले दर्शन

मावळ मराठा न्युज – कार्ला,संपूर्ण महाराष्ट्राची आराध्य दैवत असलेल्या महाराष्ट्राचे जागृत देवस्थान आई एकवीरा गडावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत अश्विन शुद्ध प्रतिपदाच्या मुहूर्तावर घटस्थापना संपन्न झाली. एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, सचिव नवनाथ देशमुख, खजिनदार संजय गोविलकर, उपाध्यक्ष सागर देवकर, सह खजिनदार विकास पडवळ, विश्वस्त पूजा अशोक पडवळ या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. २२) घटस्थापना सकाळी साडेसात वाजता करण्यात आली.

या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी अश्विन यात्रेसाठी भाविकांसाठी केलेल्या तयारीची माहिती दिली. पुण्याचे एस पी संदीप सिंग गिल यांनी देखील गडावर देवीचे दर्शन घेऊन सुरक्षा विषयी माहिती घेतली.जास्तीत जास्त भाविकांना एकविरा आईचे दर्शन सुलभपणे घेता यावे यासाठी ट्रस्टतर्फे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. भाविकांसाठी पहाटे चार वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यातयेणार आहे. आगामी काळात भाविकांची संख्या वाढल्यावर रात्रभर मंदिर सुरू ठेवण्याविषयी देखील निर्णय घेण्यात येईल असेहि विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.

घटस्थापनेसाठी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने पहाटेपासून उपस्थित होते. सकाळपासून देवीची काकड आरती, महापूजा व नंतर घटस्थापना करण्यात आली. हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. पूर्ण मंदिर परिसराला विविधरंगी फुलांनी सजविण्यात आले आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page