संभाव्य राजकीय भूकंप झालाच तर,अजित दादा भाजप मध्ये गेले तर? काय असणार मावळची राजकीय स्थिती


मावळ मराठा न्यूज:- लोणावळा ,सध्या महाराष्ट्रात अजितदादांच्या बाबतीत राजकीय भूकंपाच्या बातम्या येत आहेत तसे काही से चित्र ही दिसत आहेत,वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी येत्या १५ दिवसात दोन राजकीय भूकंप होणार असल्याचे वक्तव्य केले आहे.अमित शाह, अजित पवार भेटी बाबत बोलले जात आहे, नागपूरच्या महा विकास आघाडीच्या वज्र मूठ सभेत अजित दादा उपस्थित नसणे, त्यांचे भाषण न देणे, राष्ट्रवादी पक्ष महा विकास आघाडी मधेच राहीन ज्यांना जायचे ते जातील असे शरद पवार यांचे विधान , ईडी चा दबाव या सर्व गोष्टी राज्यातील राजकीय भूकंप तोही अजित पवार भाजप मध्ये जाणार याला पूरक दिसतात,आणि भूकंपला पुष्टी देणाऱ्याच दिसतात, जर तसे झाले तर मावळला नक्की काय मिळणार ?मंत्रीपद मिळणार? पुढील वर्षी होणाऱ्या विधान सभेत आमदार कुणाचा असणार ?अश्या विविध प्रश्न मावळातील जनते पुढे निर्माण होत आहे. मावळ चे राष्ट्रवादी चे आमदार सुनील शेळके हे अजित दादांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे राजकीय गणित मावळ मधे बदलू शकतात. दोन कट्टर विरोधक प्रतिस्पर्धी आजी माजी एकत्र येतील का?माजी आमदार बाळा भेगडे यांचं भाजप मध्ये चांगले वजन आहे,ते राज्य मंत्री राहिलेले आहेत,तर सुनील शेळके अजित दादाचे कट्टर समर्थक आहेत,पिंपरी चिंचवड चे अण्णा बनसोडे,धनंजय मुंढे, अनिल देशमुख, नवाब मलिक आदी वर ईडी चा ससेमिरा चालूच आहे त्यामुळे शिवसेनेसारख्या दुसरा राजकीय भूकंप राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होवू शकतो. तसे झाल्यास मावळ ची राजकीय स्थिती नेमकी काय असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसे झाल्यास दोन्ही आजी माजी आमदार एकत्र येणार का? मावळ ला मंत्री पद मिळणार का? पुढील वर्षी होणाऱ्या विधान सभा निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळेल? अश्या सर्व गोष्टी बाबत मावळ मधील जनतेत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पाहू या काय होतो राजकीय भूकंप, कसा होतो राजकीय भूकंप,आणि काय असतील मावळ मधील राजकीय गणिते? हे येणारा काळच ठरवेल. कारण एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडल्या नंतर राज्यात काहीही होवू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु खरी अडचण असते ती कार्यकर्त्यांची त्यांना त्यांचे वरिष्ठ जिकडे जातात तिकडे जावेच लागते .आता दोन कट्टर विरोधी पक्ष राष्ट्रवादी भाजप मावळात एकत्र आले तर कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडेल आणि म्हणेल विठ्ठला कोणता झेंडा घेवू मी हाती??




