नृत्यकला मंदिरच्या नृत्य कार्यशाळेचे निगडीत उदघाटन



मावळ मराठा न्यूज :- पिंपरी(प्रतिनिधी) निगडी येथील नृत्यकला मंदिर च्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक नृत्य दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या नृत्य कार्यशाळेत विद्यार्थ्यांना गुरू तेजश्री अडिगे यांनी १० दिवसीय नृत्य कार्यशाळेचे आयोजन केले असून या शिबिरामध्ये प्रख्यात विविध कोरिओग्राफर कडून नृत्य शिकवले जाणार आहे.. बॉलीवूड करिता वयोगट ५ ते ८ करिता विणा भोसले आणि वयोगट ९ ते १२ करिता सॅंडी तसेच १६ वर्षा वरील विद्यार्थ्यांना तेजश्री अडीगे उपशास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य शिकवणार आहेत. तसेच सुप्रसिद्ध टीव्ही फेम नर्तिका बेली डान्स स्पेशल सिराज इराणी यांची शिष्य साक्षी तांजे बेली डान्स शिकवणार आहे. तसेच महिलांकरिता विशेष बॅच घेण्यात येणार आहे. त्यात त्यांना उपशास्त्रीय व लावणी नृत्य शिकवण्यात येणार आहे.. याप्रसंगी वर्षानुवर्ष नृत्य शिबिरात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी नृत्याची प्रात्यक्षिके करून दाखवली. यावेळी लोकनृत्य,कंटेम्पररी नृत्य, उपशास्त्रीय नृत्य बेली डान्स बॉलीवूड असे अनेक प्रकाराचे सादरीकरण खालील विद्यार्थ्यांनी केले, भाजप च्या उत्तर भारतीय मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष डॉ संजीवनी पांडे यांची उपस्थिती होती. नृत्य कला मंदिरच्या विद्यार्थिनी शर्वरी खत्री आणि महेश्वरी जोशी यांनी गणपती गुरु आणि नटराज वंदन केले. भरतनाट्यम शिकत असताना सुद्धा इतर नृत्यचा अभ्यास करणे गरजेचे आहे. असे तेजश्री अडिगे म्हणाल्या.यावेळी भारतीय लोकनृत्य,कंटेंमररी नृत्य,बॉलिवूड आणि बेल्ली डान्स ही नृत्य सादर केली.. नृत्यमंदिरचे त्यामुळेच अशा प्रकारचे उन्हाळी नृत्य शिबीराचे गेली २२ वर्षे आयोजन केले जात आहे. यातूनच संस्थेचे अनेक विद्यार्थी टीव्ही चित्रपट या माध्यमातून झळकले आहे. विना भोसले हिने “वाजले कि बारा” गाण्यावर लावणी नृत्य सादर केले.विद्युत खत्री आणि अदिती यांनी बॉलीवूड नृत्य सादर केले.हे शिबिर नृत्य कला मंदिर गेली बावीस वर्षे घेत आहेत आणि या पूर्ण शिबिराकरिता सहकार्य करणारी नृत्यकला मंदिऱाची ज्येष्ठ विद्यार्थिनी व स्टाईल मिसेस आयकॉन प्राप्त सुप्रिया धाइंजे हिने मुजरा नृत्य करून कार्यक्रमाची सांगता केली. आणि रसिकांची टाळ्यांची दाद मिळवली.या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता अविनाश अडिगे , प्रशांत शिंदे तुषार जंगले यांनी कष्ट घेतले




