खंडाळाची लोणावळ्याला आर्त हाक !मला सुद्धा तुझ्यासोबत येऊ दे,मी सोयीअभावी खितपत पडतोय!

मावळ मराठा न्युज :- लोणावळा, खंडाळा ही दोन्ही नावे जगभरात सोबतच घेतले जातात . लाखो पर्यटक जगभरातून लोणावळा, खंडाळा येथे आनंद घेण्यासाठी येतात.परंतु कोरोना आणि लॉक डाउन पासून येथील नागरिकांना मूलभूत सुविधापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ना तिकडे कुठली बस पिंपरी चिंचवड ची जाते ना पुणे लोणावळा लोकल! खोपोली बस चे दर्शन सुद्धा दुर्मिळच घडते.पूर्वी थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्या सुद्धा नाहीत. त्यामुळे खंडाळा वासियांना सावत्र भावाची वागणूक दिली जाते आहे अशी भावना त्यांची झाली आहे असे चित्र १२ तारखेला लोणावळा रेल्वे रोको आंदोलन निमित्त बहुतांश खंडाळा वासियांची भावना त्याप्रमाणे दिसून आली. तरी खंडाळा च्या मूलभूत सोयीबाबत खरोखर विचार करण्याची वेळ आली आहे. खंडाळा हे गांव लोणावळा नगरपालिकेचा एक भाग असले तरी तसेच जगाच्या, महाराष्ट्राच्या नकाशावर थंड हवेचे ठिकाण (हिलस्टेशन ) असले तरी खंडाळा शहर हे खरोखर गाव वाटायला लागले आहे. खंडाळा गावात दिवसातुन एक एसटी धावते, खंडाळा गावात रेल्वे स्टेशन आहे परंतु तेथे रेल्वे थांबत नाही, तिकिट विक्री होत नाही पुणे-लोणावळा लोकल लोणावळया पर्यंत येते व पुन्हा परत जाते, शेजारील खोपोली नगरपालिकेची सिटी बस ही आपले दारातुन ये-जा करून उत्पन्न मिळविते, परंतु खंडाळा गावात ठराविक ठिकाणी थांबत नाही जेणेकरून ग्रामस्थांना तिचा उपयोग होत नाही, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बसेस निगडी-लोणावळा पर्यंत ये जा करतात तसेच परंतु खंडाळा गावात सर्वांना रिक्षा सेवेशिवाय साधन राहिले नाही, गरीब, मोलमजूरी करणा-यांना, त्यांचे मुलांना शिक्षणासाठी लोणावळा व पुणे येथे जावे लागते परंतु ठोस असे वाहतुकीचे साधन नाही, गावातील एक ब्रिटीशकालीन तलाव आहे त्यामध्ये आजुबाजुच्या रहिवाशींच्या ड्रेनेजचे पाणी जाऊन ते तलाव दुषित झाले आहे. टाकवे बु, पवनानगर या ग्रामिण भागात पीएमपीएल बसेसची सोय आहे परंतु आपल्या शहरी परंतु गाव समजल्या जाणा-या खंडाळा गावात अशी सोय उपलब्ध होत नाही हे आपले खंडाळा ग्रामस्थांचे दुर्दैव म्हणावे लागेल.सर्व ग्रामस्थांनी यावर विचार करणेची वेळ आली आहे शासनाकडुन या सर्व सोई सवलती सहज उपलब्ध होतील अशी परिस्थिती राहिली नाही व तशी स्वप्नेही कोणी पाहू नयेत. गावात या सर्व सोयी,सवलती प्राप्त करावयाच्या झाल्यास सर्वांना एकत्र येऊन नगरपालिकेशी, रेल्वेप्रशासनाशी, एसटी महामंडळाशी, खोपोली, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी चर्चा, पत्रव्यवहार करावा लागेल, संघर्ष करावा लागेल परंतु याबाबत कोणीही गांभिर्याने घेताना दिसत नाही.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page