यापुढे शाखाप्रमुख,विभाग प्रमुखांना विचारात घेऊनच पदे दिली जातील- सचिन अहिर


मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर यांच्या आदेशानुसार व पुणे जिल्हा प्रमुख ॲड गौतम चाबुकस्वार, पुणे जिल्हा संघटक अविनाश रहाणे मावळ, उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, विधानसभा संपर्कप्रमुख प्रभाकरजी पवार,तालुका प्रमुख आशिष ठोंबरे उपतालुका प्रमुख एकनाथ जांभुळकर यांच्या मार्गदर्शनाने आज हॉटेल लेमन ट्री मळवली दिनांक १८ – ५ – २०२३ रोजी जिल्हा परिषद गट कुसगाव- वरसोली विभागातील सर्व विभाग प्रमुख उप विभाग प्रमुख व शाखाप्रमुख यांची येत्या काही दिवसात पक्षाच्या वतीने ज्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात येणार आहेत त्याविषयी प्रत्येक शाखाप्रमुखांचे मत ऐकण्यात आले तसेच प्रत्येक शाखाप्रमुखाकडून गावातील अडचणी विषयी विषय समजून घेऊन त्या नमूद करण्यात आल्या व मीटिंगमध्ये असे ठरवण्यात आले की यापुढे शाखाप्रमुखांना, विभाग प्रमुखांना विचारात घेऊन पुढील पदे वाटण्यात येईल व शाखाप्रमुखांनी जे काही मुद्दे मांडलेत त्यांचे निरीक्षण विचार करून तोडगा काढण्यात येईल. सदरची मीटिंग उप तालुका प्रमुख श्री. एकनाथ जांभुळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली या वेळी तालुका संघटक अशोक निकम , तालुका समन्वयक अनंताभाऊ हुलावळे, उपविभाग प्रमुख संतोष बोंबले, शाखा प्रमुख वेहरगाव, कैलास भाऊ पडवळ ,शाखाप्रमुख वळक रोहीत बांगर, शाखाप्रमुख वाकसई चंद्रकांत भाऊ मडके, शाखाप्रमुख काहनुभाऊ बोंबले पिंपळोली शाखाप्रमुख पाथरगाव रमाकांत बालगुडे, शाखाप्रमुख शिलाटणे अक्षय येवले,शाखाप्रमुख केवरे कृष्णा शेळवणे,शाखा प्रमुख कुसगाव शिवाजी गाडे, शाखा प्रमुख भैरवनाथ नगर सुरज देशपांडे, शाखा प्रमुख कुरवंडे सुनिलभाऊ मातेरे, शाखा प्रमुख कुसगाववाडी नितीन म्हसकर, शाखाप्रमुख गोपाळ मावकर दहिवली उपशाखाप्रमुख वेहरगाव दिनेश पडवळ ,उपशाखाप्रमुख वाकसाई सुधाकर येवले,उपशाखाप्रमुख कुसगावशंकर वाजे,शिवसैनिक सुर्यकांत ढाकोळ , शिवसैनिक वसंत पडवळ युवा सेना उपशाखा अधिकारी कमलेश गाढवे शिवसैनिक शिवाजी लांडगे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




